Kandivali Crime : शहरात विविध घटनेत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोरेगाव आणि कांदिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
पहिल्या गुन्ह्यातील ४१ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहात असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही मुलगी परिसरातील एका मंदिराजवळून जात होती. यावेळी तिला मंदिरातील २० वर्षांच्या पुजारी तरुणाने प्रसाद देण्याचा बहाणा करून बाजूला नेले.
तिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घरी आल्यानंतर तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर तिने मुलीसोबत गोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मंदिरातील पुजाऱ्याविरुद्ध ३५४ अ, भादंवि १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर तो पळून गेला होता, मात्र काही तासांत त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. दुसरी घटना कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये ४० वर्षांची तक्रारदार महिला राहात असून तिला १५ वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता ही मुलगी तिच्या क्लासवरून घरी जात होती.
यावेळी याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका ४१ वर्षांच्या रहिवाशाने तिचा पाठलाग करून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नंतर तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३५४ डी भादंवि सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.