मुंबई

Mumbai Crime: खड्ड्यांचा जाब विचारला म्हणून प्रवाशाला ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने केली जबर मारहाण

Highway: मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम भर पावसाळ्यात चुकीच्या पद्धतीने केले जात आहे

Chinmay Jagtap

मुंबई अहमदाबाद महामार्गावर डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात म्हणून सद्ध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून चार महिन्यांच्या नव्या कामातही खड्डे निर्माण झाल्याने महामार्गाचा प्रवास धोकादायक झाला आहे .

याचा फटका एका चार चाकी चालकाला लागल्याने महामार्गवरील या खड्ड्यांबाबत त्याने जाब विचारला असता त्या २८ वर्षीय तरुणास ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून जबर मारहाण केली असल्याची खबळजनक घटना वसई पूर्वेस घडली आहे .

हितेश चौधरी असे या तरुणाचे नाव असून तो कोपर गावातील स्थानिक रहिवासी आहे . तो आपल्या पत्नीसोबत चारचाकी वाहनाने मुंबई अहमदाबाद महामार्गाने मंगळवारी पालघरहून शिरसाडच्या दिशेने येत असताना दुपारी साडे तीन वाजता भारोळ येथील खड्ड्यात त्याची गाडी आदळली, खड्डा मोठा असल्याने खड्ड्यात गाडीच्या पुढील चाकाचे डिस्क दबले गेले, त्यानंतर स्टेपनी लावून , गाडी दुरुस्ती करून त्याने पुढील प्रवास सुरु केला.

दरम्यान काही अंतर पुढे सकवार येथील मॅक्सिस हॉटेल समोर महामार्गाचे काम सुरू होते .यावेळी हितेश ने गाडी थांबवून काम करणारे ठेकेदार कोण आहेत, असा सवाल केल्यानंतर इंजिनीयर धर्मेश शहा हा पूढे आला . यावेळी हितेश यांनी महामार्गाचे काम नीट करा आताच माझ्या गाडीचे नुकसान झाले आहे असे बोलता- बोलता खड्ड्याबाबत दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली . त्यांनतर हितेश याला महामार्गावरील काम सुरू असलेल्या ठिकाणी नेले व तू खड्डा भरतोस का, असा सवाल करीत धर्मेश यांनी मारहाण केली व शिवागाळ करीत गाडीच्या चावीने कानावर, डोक्यावर, पायावर दुखापत केली.

या मारहाणीत दुखापत होऊन रक्त निघाले, कानाखाली जोरात लागल्याने ऐकायलाही कमी येऊ लागले असल्याचे हितेश याने तक्रारीत सांगितले आहे .

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम भर पावसाळ्यात चुकीच्या पद्धतीने केले जात असुन अनेक ठिकाणी पावसाळ्यात खड्डे निर्माण झाले आहेत .सर्व्हिस रोडला वळण घेण्यासाठी उतार रस्ताही केला जात नसल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे .जनतेच्या पैशाने कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदारांला सामान्य माणसाने जाब विचारला तर त्यास मारहाण केली जाते .या घटनेचा तीव्र शब्दात या भागात निषेध केला जात आहे.

ही घटना माहीत पडताच हितेश यांच्या नातेवाईकांनी मांडवी पोलीस ठाण्यात धाव घेतली व सदर घटनेबाबत तक्रार दाखल केली . मांडवी पोलिसांनी धर्मेश शहा यांच्यावर मारहाण करण्या बाबतचा गुन्हा दाखल केला असून मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT