मुंबई

Mumbai Crime: बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; 7 वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग, पोलिसांमुळे घटना उघड

Latest Naigaon News :

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

Latest Mumbai Crime : बदलापूर येथील घटनेची वसईच्या नायगाव मध्ये पुनरावृत्ती झाली आहे. नायगाव मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपहागृहात काम करणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बदलापूर घटनेच्या नंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत good टच, बॅड टच हे आवेरनेश कॅम्प घेतले असता पीडित मुलींने आपल्या शिक्षिकेला ही घटना सांगितल्या नंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून, अल्पवयीन मुलाला अटक करून, रिमांड होम मध्ये पाठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित मुलगी ही दुसरीत शिकणारी आहे. तर आरोपी 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा हा त्याच शाळेतील उपहारगृह मध्ये काम करीत होता. बदलापूर घटनेच्या नंतर नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळा, आश्रमशाळा याठिकाणी आवेरनेश कॅम्प लावून, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच मुलं, मुली यांना गुड टच, बॅड टच याविषयी मार्गदर्शन केले.

याच वेळी नायगाव मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका 7 वर्षाच्या दुसरीत शिकणाऱ्या मुलीने उपहारगृ मध्ये काम करणारा मुलगा मला त्रास देतो असे आपल्या शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापिका यांना याची माहिती देताच त्यांनी तात्काळ संबंधित पीडित मुलीला बोलावून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पिडीतीने घडला सर्व प्रकार सांगितला.

घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापिकेने हा सर्व प्रकार नायगाव पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी ही कोणताही विलंब न लावता तात्काळ विनयभंग आणि।पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून, आरोपी मुलाला अटक करून, वसई।न्यायालयाच्या आदेशावरून रिमांड होम मध्ये पाठविले आहे.

बदलापूर घटने नंतर शाळेतील मुलींच्या सुरक्षेबाबत आम्ही सतर्क झालो होतो. आम्ही आमच्या पोलीस ठाण्या अंतर्गत असणाऱ्या सर्व इंग्रजी, मराठी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, सफाई कर्मचारी, मावशी यांचे आवेरनेश कॅम्प घेतले आहेत. नायगाव मधील शाळेतील प्रकार ही त्यातून उघड झाला आहे. याबाबत आम्ही गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक करून अल्पवयीन असल्याने रिमांड होम मध्ये पाठवले आहे. पण अशा घटना टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने याची काळजी घेणे, शाळेत सीसीटीव्ही बसवुन, लहान चिमुरड्या ची काळजी घेणे गरजेचे आहे

रमेश भामे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

नायगाव पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT