मुंबई

मोठी घडामोड, हेमंत नगराळेंकडून मुंबई पोलिस दलात मोठा बदल

पूजा विचारे

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबाँम्बमुळे एकच खळबळ उडाली. असं असतानाही मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे फेरबदल करण्यात आलेत. 

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी  क्राईम ब्रांचमधील काही अधिकाऱ्यांची बदली केल्याची माहिती दिली आहे. क्राईम ब्रांचमध्ये गेल्या काही वर्षांपासून असलेल्या पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांचच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यात PSI, API आणि वरिष्ठ PI दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसंच अनेक अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर प्रशचिन्ह उपस्थित झालं होतं.  त्यातच पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होताना दिसत आहे. अशातच या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. 

या बदल्यात एक विशेष गोष्ट म्हणजे,  मुंबईतील सर्व युनिट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्यात. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलिस दलात पाठवण्यात आलं. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकाऱ्यांची मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशी होत आहे.

Mumbai Crime Branch transfer 65 police officers decision by hemant nagrale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT