फेसबुकवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्यावर अत्याचार करून फरारी झालेल्या तरुणाला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. ४) भाईंदरमधून अटक केली. पीडितेने संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला असता तिचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करण्याची धमकीही आरोपीने दिली होती. एक महिन्यापूर्वी याप्रकरणी आचोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वारंवार ठिकाण बदलून राहणाऱ्या विश्वनाथ भगत (वय २२) या आरोपीला मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने अखेर एक महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत.
भगतला भाईंदर पश्चिम येथील रुपलक्ष्मी बिल्डिंग, क्रॉस गार्डनजवळील वेलकनी चर्चजवळून ताब्यात घेण्यात आले. २०२२ ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आरोपीने फेसबुकवर पीडित मुलीसोबत मैत्री केली.
यादरम्यान आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने आरोपीशी संपर्क बंद करण्याचा प्रयत्न केला. या रागामुळे आरोपीने तिचे अशीलिल फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. मुलीच्या तक्रारीवरून आचोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपले राहण्याचे ठिकाण बदलून फरारी झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.