मुंबई - दादर स्थानकात महिलेचा विनयभंग करुन तिच्याकडील रोख रक्कम खेचुन तीला एक्सप्रेसमधुन ढकलून देण्याची घटना घडली. आरोपी मनोज चौधरीला दादर रेल्वे पालीसांनी अटक केली आहे.
सदर आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांनी लोहमार्ग पोलीस आयुक्त मुंबई यांना पत्र लिहिले आहे.
या घटनेतील आरोपी विरोधात सबळ पुरावे व चांगले विधीतज्ञ उपलब्ध करुन दयावे. तसेच जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार व समुपदेशन उपलब्ध करुन दयावे तसेच तिचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पीडित महिलेचा मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी प्राधिकरणकडे पाठवावण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी पत्राद्वारे दिले आहे. गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तिला धीर दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.