Mumbai Crime : इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबूक यांसारख्या समाज माध्यमातून होणाऱ्या ओळखी आणि त्यातून झालेली फसवणूकीचे प्रकार नेहमीच समोर येत असतात. परंतू याला अल्पवयीन मुले देखील बळी पडत असल्याची घटना समोर आली आहे.
इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख वाढविली. नंतर तिला प्रेमाच्या आणाभाका देऊन रेल्वे स्टेशन वरुन पळवून नेल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात उघडकीस आली आहे. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने दोन दिवसांत आरोपीचा शोध घेत मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. रविंद्र रातंबे असे अटक आरोपीचे नाव आहे.
संबंधित अल्पवयीन मुलीची रविंद्र याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा कुटूंबासह प्रवास करत असताना मुलगी अचानक गायब झाली होती. मुलगी गेली कोठे असा प्रश्न तिच्या पालकांना पडला.
त्यांनी तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. दरम्यान एका तरुणासोबत जाताना ही मुलगी आढळून आली.
पोलिसांनी शिताफीने त्याचा शोध घेतला असता सदर मुलगी त्या मुलासह कर्जत येथील गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण गुन्हे रेल्वे पोलिसांनी कर्जत येथून रविंद्र ला अटक केली.
मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रविंद्र याने मुलीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवली होती. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यानेच तिला पळवून नेले असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.