Mumbai Crime Gold jewelery was stolen instead of hallmarked police arrested artisan within three hours Sakal
मुंबई

Mumbai Crime: सोन्याचे दागिने होलमार्क करण्याऐवजी चोरून झाला पसार, पोलिसांनी कारागिराला तीन तासात केली अटक

तो होलमार्क केंद्रावर पोहचला आहे का म्हणून बसंतीलाल यांनी त्याला संपर्क केला. तेथे तो पोहचला नसल्याचे आढळून आले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील एका सराफाने दुकानातील 12 लाख 73 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी कारागिराकडे दिले होते. कारागिराने मधल्या मधीच हे दागिने लंपास करत पळ काढला.

याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारागिराचा तीन तासात शोध घेत त्याला अटक केली. विक्रम रावल (वय 28) असे अटक कारागिराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून नऊ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळी असा 12 लाख 71 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.

डोंबिवली पूर्वेतील नेहरू रोडवर बसंतीलाल चपलोत यांचे प्रगती ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात विक्रम रावल हा काही वर्षापासून काम करत आहे. विक्रम विश्वासू असल्याने दुकानमालक बसंतीलाल यांनी गुरुवारी संध्याकाळी विक्रमकडे दुकानातील 12 लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले.

विक्रम गुरुवारी संध्याकाळी दुकानातून सोन्याचा ऐवज घेऊन बाहेर पडला. तो होलमार्क केंद्रावर पोहचला आहे का म्हणून बसंतीलाल यांनी त्याला संपर्क केला. तेथे तो पोहचला नसल्याचे आढळून आले.

त्यांनी होलमार्क केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधला, तेथेही तो गेला नसल्याचे आढळून आले. यामुळे बसंतीलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विक्रमची परिसरात शोधाशोध केली. तो कोठेच आढळला नाही. त्याचा मोबाईल देखील बंद येऊ लागला.

विक्रमने विश्वासघात करुन सोन्याचा ऐवज लांबविला असल्याची खात्री पटल्यावर बसंतीलाल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात विक्रम विरुध्द तक्रार केली. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली.

चपलोत यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाच वेळी तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे विक्रम ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांना पाहताच विक्रम पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्याकडून नऊ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळी असा 12 लाख 72 हजाराचा ऐवज जप्त केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली. विक्रम भगतसिंग रस्त्यावरील एका सोसायटीत राहतो.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, हवालदार नीलेश पाटील, विशाल वाघ, निसार पिंजारी, नितीन सांगळे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. कोळसेवाडी पोलिसांनी या अटकेसाठी साहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT