Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime: नवऱ्यानं बायकोला पेट्रोल टाकून भररस्त्यात पेटवलं! रिक्षावाल्यानं वाचवले प्राण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पतीनं पत्नीला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईतील कुर्ला इथं घडला आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील नागरिकांना या महिलेनं मदतीची याचना केली पण तिच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही. अखेर एका रिक्षा चालक मोहम्मद इस्माईल हे तिच्या मदतीला धावले आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. (Mumbai Crime Husband set his wife on fire with petrol rickshaw driver saved his life)

माध्यमांतील वृत्तानुसार, मुंबईतील चुनाभट्टी येथील सुमननगर भागातील आण्णा भाऊ साठे पुलाखाली सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित ही महिला चुनाभट्टी येथून वडाळ्याला कामाला जाण्यासाठी निघाली होती. ती साठे पुलाखालील बस स्टॉपवर पोहोचल्यानंतर त्याचवेळी तिच्या नवऱ्यानं संजय ठाकूर यानं मागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

पेटलेल्या अवस्थेत ही महिला जीवाच्या अकांतानं ओरडत होती, रस्त्यानं ये-जा करणाऱ्या लोकांकडं मदतीची याचना करत होती. पण कोणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही. पण तिथून जाणारे रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख यांनी आपली रिक्षा थांबवली तसेच आपल्याकडील बाटलीतील पाणी या महिलेच्या अंगावर ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला आपल्या रिक्षात बसवून तीला सायन रुग्णालयात दाखलंही केलं. (Latest Marathi News)

दरम्यान, वेळेत आग विझल्यानं महिला गंभीर जखमी झाली नाही तर १० टक्के भाजली. तसेच वेळेत रुग्णालयात दाखल झाल्यानं तीला वेळेवर उपचारही मिळू शकल्यानं तिचा जीव वाचला, असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)

या घटनेनंतर या महिलेचा जीव वाचवणारे रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख यांच्या धाडसाचं कौतुक करताना नेहरु नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ सौदागर यांनी त्यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुख्यमंत्र्यांच्या ‘एसआयटी’ला केराची टोपली, अहवालाकडे दुर्लक्ष करत ‘आरटीओ’ अधिकाऱ्याची बदली

खबरदार..! आता शिव्या द्याल तर, राज्यातील सहा विद्यापीठांत...

केजरीवालांचा सापळा

हे गणराया, भक्‍तांना बुद्धी दे !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 सप्टेंबर 2024

SCROLL FOR NEXT