मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक शाखा व्यवस्थापकाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या पीपीएफ खात्यातून 1.39 कोटी रुपयांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सहाय्यक शाखा व्यवस्थापक प्रियांक शर्मा, पदम सेन आणि हवाला ऑपरेटर राजेश पांचाळ यांना अटक केली असून च इतर दोन लाभार्थ्यांना पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात तक्रारदार 88 वर्षीय वृद्धाच्या मृत मुलाच्या पीएफ खात्यातून ही रक्कम हस्तातरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तक्रारदाराचा मुलगा अमित प्रसाद यांचे 2008 मध्ये अमेरिकेत निधन झाले होते. (Latest Marathi News)
थोडक्यात प्रकरण
या वर्षी मार्चमध्ये, वॉर्डन रोड येथील रहिवासी असलेल्या हनुमंत प्रसाद यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात त्यांच्या मुलाच्या नरिमन पॉइंट येथील एसबीआयच्या शाखेतील पीपीएफ खात्याबद्दल तक्रार नोंदवली. मुलाच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर, वडिलांनी त्यांच्या मुलाच्या पीपीएफ खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. (Breaking Marathi News )
"वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी, काही वर्षांपूर्वी अमित प्रसादच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. परंतु हनुमंत प्रसाद यांना ती रक्कम न मिळाल्याने त्यांना धक्का बसला. चौकशी केल्यानंतर त्यांना कळले की मृत मुलाच्या खात्यातील 1.39 कोटी रुपये काही इतर खात्यात वळवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलीस तपास
तपासादरम्यान, ही रक्कम आयसीआयसीआय बँक, गोरेगाव शाखेतील अमित प्रसाद यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती. हे खात आता बंद करण्यात आली आहे. नंतर ती रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये - गजानन एंटरप्रायझेस, लक्ष्मी एंटरप्रायजेसमध्ये हस्तांतरित करण्यात आली होती.
त्यानंतर ही रक्कम बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स कंपनीमध्ये वेगवेगळ्या नावाने वळती करण्यात आली. त्यानंतर लालीराम देवासी याने ही सर्व रक्कम भुलेश्वर मार्केटमधील एका दलालाकडून ब्रोकर मुकेश जैन यांच्यामार्फत रोख स्वरूपात घेतली आणि ती तनसुख जोशी याला दिली.
तनसुख जोशी यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता प्रेम आपण राजेश पांचाळ यांना संपूर्ण पैसे दिल्याचे पोलिसाना सांगितले. पांचाल हा बँक अधिकारी शर्माचा जवळचा मित्र असून शर्माच्या सूचनेनुसार तनसुख जोशीने पद्मा सेन आणि नीलेश कदम उर्फ सत्या नावे व्यक्तींच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याचे पोलिसाना लक्षात आले. पोलिसांच्या पथकाने सेन यांच्या घरावर छापा टाकून सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड जप्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.