Mumbai News : ठाण्याच्या वसई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातून मुंब्रा येथे राहणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीनने राजेश जानी यांचा धर्म बदलून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. धर्म बदलल्यानंतर राजेश रियाज झाला.
राजेश जानीने इस्लाम स्वीकारल्यानंतर मोहसीन त्याच्या मुलाला आणि मुलीलाही फोन करून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता.
मोहसीन अतिशय क्रुर आहे. निष्पाप लोकांना फसवून तो त्यांना धर्म बदलायला सांगत होता. तो बोलण्यात माहिर होता. इस्लाममध्ये स्वर्ग आहे, स्वर्गात सोन्या-चांदीच्या विटांच्या भिंती आहेत, दारू आणि दुधाच्या नद्या आहेत, असे सांगून तो हिंदूं लोकांचे ब्रेनवॉश करत होता. यासोबतच तो हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलायचा आणि त्या गोष्टींवर लोकांचा विश्वास बसवण्याचा प्रयत्न करायचा, अशी माहिती मिळत आहे.
मोहसीन याने स्वत: ४०० लोकांचे धर्मांतरण केल्याचा दावा केला आहे. वांद्रे येथील प्रोफेसर जफर आणि फारुख भाई यांच्या मदतीने एकत्रितपणे कामे केल्याचे मोहसीनने सांगितले आहे. (Mumbai Crime News)
मोहसीन सहकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांना धर्मांतरित करून घेत होता. आता मोहसीनच्या अटकेनंतर जफर आणि फारुख यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे. कलम २९५ अ आणि आयपीसी कलम ३ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला. आता या रॅकेटमध्ये किती लोक सामील आहेत, याचाही पर्दाफाश होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.