मुंबई : मालाड परिसरात पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांनी 13 वर्षीय मुलाचे अपहण केले. त्या मुलाला निर्जनस्थळी नेऊन आरोपींनी मुलाच्या बापाकडे चक्क 10 लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या मुलाच्या बापाने पोलिसांची मदत घेतल्यानंतर मालाड पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना शोधून काढत अटक केली आहे.
महत्त्वाची बातमी : दिल्लीत सुरु आलेल्या आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं 'मोठं' विधान, उपस्थित केली गंभीर शंका
मालाड पोलिसांच्या परिसरातून 13 वर्षाचा अल्पवयीन मुलगा जात होता. त्यावेळी तोंडाला मास्त नसल्याचे कारण सांगत आरोपींना त्याची वाट अडवली. त्यावेळी दोघा आरोपींनी स्वतःची ओळख ही पालिका कर्मचारी असल्याचे सांगितले. दोघांनी कारवाई करण्याच्या नावाखाली मुलाला कांदिवली लिंक रोड परिसरातील एका निर्जनस्थळी नेले. त्यावेळी मुलाला दोघांनी जिवे ठार मारण्याची भिती घातली. तसेच मुलाकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेत आरोपींनी मुलाच्या वडिलांना फोन केला. तसेच मुलाच्या सुटकेसाठी आरोपींनी मुलाच्या वडिलांकडे 10 लाख रुपये खंडणी मागितली.
महत्त्वाची बातमी : "पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही शेतकरी कायद्यांचा विरोध करणार" - अजित नवले
मुलाचे अपहण झाल्याचे समजताच त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी मुलाच्या बापाने मालाड पोलिसात धाव घेत पोलिसांकडे मदत मागितली. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिस कामाला लागले. कोणताही पुरावा नसताना अवघ्या एका तासात गुन्हा सोडवून आरोपींना अटक केली. या मुलाचा ताबा पोलिसांनी त्याच्यापालकांना दिला आहे. या आरोपींवर मालाड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
mumbai crime news police solved kidnapping case within one hour
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.