डोंबिवली - उल्हासनगर येथील व्यवसायिक नरेश रोहरा याच्या कार्यालयाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपी नवीन केशवानी याला उत्तर प्रदेशातील बनारस येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगरसह आसपासच्या परिसरात नवीनने दहशत माजविली होती. त्याच्या अटकेमुळे अनेख गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी दिली.
गेल्या महिन्यात उल्हासनगर कॅम्प 5 येथील प्रभाराम मंदिराजवळील नरेश रोहरा यांच्या कार्यालयाबाहेर मद्यधुंद अवस्थेत असलेले चार आरोपी व नरेशच्या सुरक्षा रक्षकामध्ये झालेल्या वादानंतर सदर आरोपींनी देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळीबार केला होता. या घटनेत एका आरोपीने "नवीनचा पाठलाग सोडा, अन्यथा नरेशला गोळ्या घालू" अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी पोलिसांनी सुरत आणि गुजरातमधील अन्य ठिकाणांहून चार आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवीन केशवानी मात्र फरारच होता. दरम्यान हिललाइन पोलिसांनी नवीनचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांचे पथक तयार करून त्याच्या अटकेसाठी सक्रिय केले. या पथकाने यशस्वीपणे सापळा रचून आरोपी नवीनला उत्तर प्रदेश राज्यातील बनारस येथून अटक केली.
आरोपी नवीन केशवानीला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नवीनच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नवीन केशवानी याच्या विरोधात विठ्ठलवाडी, हिललाइन, सेंट्रल आणि शिवाजीनगर इत्यादी पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, आठवडा वसुली, प्राणघातक हल्ला, घरफोडी, आदी गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.