गुन्हे शाखेने आंतरराज्यीय मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड करत 2 वर्षांचा मुलगा आणि 2 महिन्यांच्या मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी शब्बीर खान, 28, आणि त्यांची पत्नी सानिया, 26 या मुलांच्या पालकांसह 8 आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अमली पदार्थांच्या सेवनासाठी आरोपी पालकांनी मुलाला विकल्याचा आरोप आहे. या पालकांच्या चौकशीत मुलांची तस्करी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे
गुरुवारी, मुलांच्या आत्याने डीएन नगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मुलांचे पालक हे अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी आहेत. या व्यसनासाठी त्यांनी पोटच्या मुलाला 60000 तर मुलीला 14000 रुपयांना विकल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच दिवशी जोडप्याला आणि एका 42 वर्षीय व्यक्तीला अटक केली. तपासादरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पसरलेल्या मुलांच्या तस्करीचे जाळे उघडकीस झाले आहे.
घटना थोडक्यात
आरोपी शब्बीर आणि सानिया दाम्पत्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. अंमली पदार्थ सेवनाशिवाय जगणे त्यांच्यासाठी अशक्य होते. त्याचवेळी आरोपी महिला सानिया उषा राठोडच्या संपर्कात आली
आरोपी उषाने आरोपी खान दाम्पत्याला मुलाला विकण्यासाठी तयार केले. दांपत्याला 2 वर्षांचा मुलगा हुसेन आणि एक महिना 22 दिवसांची मुलगी आहे. आरोपी जोडप्याने मे 2022 मध्ये हुसैनला 60000 रुपयांमध्ये एका व्यक्तीला विकले. ज्या व्यक्तीला मुल विकण्यात आले त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
तसेच या जोडप्याला नुकतीच एक मुलगी झाली होती. हुसेननंतर त्यांनी गेल्या महिन्यात मुलीलाही आरोपी शकील मकरानी यांना 14 हजार रुपयांमध्ये विकले. शब्बीरची बहीण रुबिना खान हिला या घटनेची ची माहिती मिळताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने तातडीने अंधेरी येथील डी.एन. नगर पोलीस ठाण्यात भाऊ व वहिनीविरोधात तक्रार केली. डी. एन. नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.