डोंबिवली - पत्नीपासून विभक्त रहात होता...त्यातच त्याला कॉलगर्लचा नाद लागला होता. त्यांच्यावर पैशांची उधळपट्टी तो करत असे. मात्र एक कॉलगर्ल नंतर घरी येत नसल्याने त्याने तिला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने मैत्रीण तिचा प्रियकर आणी साथीदार यांनी संगनमताने 42 वर्षीय व्यक्तीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना बापगावं मध्ये घडली.
दिपक कुऱ्हाडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शिवानी, भारती या कॉलगर्ल सह संदिप पाटील याला अटक केली आहे. तर फरार देवा रॉय याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक कुऱ्हाडे हा गेल्या चार वर्षांपासून बापगाव मधील मल्हार चाळीत रहात होता. तो मुळचा बीड जिल्ह्यातील असून इंटिरीअरचे काम तो घेत असे. पत्नीपासून तो विभक्त राहात असताना तीन वर्षापूर्वी त्याची ओळख कॉलगर्ल शिवानी हिच्याशी झाली.
कधी कधी शिवानी सोबतच इतर कॉलगर्लला घरी बोलावून तो त्यांच्यावर पैशांची उधळपट्टी करत असे. मध्यंतरी शिवानी हीने दिपकच्या घरी येणे बंद केले. 29 जून 2023 दिपकने शिवानीला कॉल करुन घरी बोलावले.
मात्र ती न आल्याने त्याने तिला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने तिने साथीदार संदिप, तिची मैत्रीण कॉलगर्ल भारती तिचा प्रियकर देवा यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी एकमेकांशी संगनमत करत दिपकच्या घरी ऐवज आणि रोकड लुटण्याचा कट रचला होता.
दिपकने शिवानीला पुन्हा कॉल केला. त्यानुसार 30 जून ला शिवानी व भारती या दिपकच्या घरी रिक्षाने आल्या. त्यांनी दिपकला जास्त प्रमाणात दारु पाजली. तो नशेत टल्ली झाल्यावर संदिप व देवा दिपकच्या घरी दुचाकीवरुन आले. या चौघांनी मिळून दिपकच्या डोक्यात दारुची बाटली फोडली, धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. जाताना त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली.
2 जुलैला दिपकच्या आईने त्याच्या मोबाईलवर त्याच्याशी संपर्क साधला. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने ही गोष्ट तिने कल्याण येथे राहणाऱ्या दिपकच्या पत्नीला सांगितली. दिपक सोबत काही झाले नाही ना याची शंका आल्याने घरी जाऊन पाहून येण्याची विनंती आईने सूनेला केली.
यामुळे दिपकची मुलगी दिपकच्या घरी बापगावला केली. घराला बाहेरुन कडी लावलेली असल्याने मुलीने कडी उघडून घरात बघताच वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसते. या घटनेची माहिती पडघा पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पडघा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश माणेरे यांच्या पथकाने याचा तपास सुरु केला.
सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथील माणेरे गावातून शिवानीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने संदिप, देवा व भारती असे सर्वांनी मिळून दिपकची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संदिप व भारती यांना देखील अटक केली असून त्यांच्याकडून 30 हजार रुपये रोख रक्कम, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. तर देवा याचा पोलिस शोध घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.