police fir sakal media
मुंबई

वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा; बोईसरमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

पालघर : व्यावसायिक गाळ्याबाहेर लावलेले वीजमीटर चोरून (electric meter robbery) त्याचा वापर निवासी व व्यावसायिक गाळ्यांमध्ये वीजचोरी करण्यासाठी होत असल्याची घटना बोईसर एमआयडीसी (Boisar MIDC) उपविभागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोईसर येथील सोनू हृदयानंद पांडे याच्याविरुद्ध बोईसर पोलिस ठाण्यात (boisar police thane) फसवणूक आणि वीजचोरीचा गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

अवधनगर येथील शेख कम्पाऊंडमध्ये थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी करत असताना उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, सहायक अभियंता राहुल पाचपांडे व वरिष्ठ तंत्रज्ञ तुषार जोशी यांना हा प्रकार निदर्शनास आला. थकीत रकमेचा पूर्ण भरणा करून विनंती अर्ज केल्यानंतर इबरार अलीबहादूर खान यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; परंतु प्रत्यक्ष पाहणीत त्यांचा वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले.

अधिक तपासणी केली असता खान यांच्याशिवाय शेख कम्पाऊंडमधील दुमजली इमारतीत असलेल्या ११ खोल्यांना एकाच मीटरमधून वीजपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले. मूळ ग्राहक राजेश उत्तम गुप्ता यांच्या द्विवेदी कम्पाऊंड येथील फरीहा अपार्टमेंटमधील दुकानाबाहेरून मार्च २०२१ मध्ये चोरीला गेलेले हे मीटर असल्याचे चौकशीत आढळले.

आरोपी सोनू पांडे याने राजेश गुप्ता यांचे मीटर चोरून मीटर शेख कम्पाऊंडमध्ये अनधिकृतपणे बसवले व ७४ हजार ८८० रुपयांची वीजचोरी केली. तसेच वीज जोडणीच्या नावाखाली शेख कंपाऊंडमधील रहिवाशांकडून आरोपी पांडे याने पैशे घेतल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT