mumbai crime update online samosa order fraud of lakh rs police cyber crime Sakal
मुंबई

Mumbai Crime : ऑनलाईन समोसे ऑर्डर करणे पडले महागात; डॉक्टरला लाखोंचा गंडा

सायबर भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्या खात्यातून सुमारे दीड लाख रुपये लंपास केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मित्रांसोबत कर्जतला सहलीसाठी जाण्यास निघालेल्या परळ येथील केईएम रुग्णालयातील डॉक्टरला ऑनलाईन समोसे मागवणे भलतेच महाग पडले. सायबर भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्या खात्यातून सुमारे दीड लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी भोईवाडा पोलीसानी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणात तक्रारदार केईएम रुग्णालयात रहिवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. शनिवारी त्यांनी मित्रासोबत कर्जतला सहलीसाठी जाण्याचा बेत आखला. त्यासाठी गुरूकृपा हॉटेलमधून समोसे खरेदी करण्याचे त्यांनी ठरवले.

ऑनलाईन हॉटेलचा संपर्क क्रमांक शोध घेतला असता त्यांना एका संकेतस्थळावर हॉटेलचा दूरध्वनी क्रमांक सापडला. डॉक्टरांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता समोरच्या व्यक्तीने आपण हॉटेलमधून बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर डॉक्टरांनी 25 प्लेट समोसे हवे असल्याचे त्या व्यक्तीला सांगितले.त्यावर कथित होटेलचालका दीड हजार रुपये आगाऊ द्यावे आणि व्यवहाराची माहिती व्हॉट्स ॲपवर देण्याची मागणी केली.

व्यवहार केल्यानंतर आरोपीने व्यवहार क्रमांक तपासावा लागेल यासाठी गुगल पेवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच 28807 हा क्रमांक रक्कम या रकान्यात टाकून ॲड नोट्स पर्याय निवडण्यास सांगितला.

तक्रारदार डॉक्टरांनी तसे केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 28 हजार 807 रुपये हस्तांतरित झाल्याचा संदेश त्यांना आला. त्यानंतर ती रक्कम परत मिळवण्यासाठी आरोपींनी डॉक्टरला विविध व्यवहार करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामधून सुमारे 1 लाख 40 हजार रुपये हस्तांतरित झाले.

ऑनलाईन व्यवहार नको, मी हॉटेलवर येऊन बोलतो, असे डॉक्टरांनी सांगताच त्या व्यक्तीने दूरध्वनी ठेवला. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तात्काळ भोईवाडा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. रक्कम हस्तांतरित झालेल्या बँक खात्यांची माहिती पोलिसांनी बँकेकडे मागितली आहे. त्याद्वारे पुढील तपास करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT