Culprit Arrested sakal media
मुंबई

मुंबई : NCB च्या धाडीत 13 कोटींचं ड्रग्ज जप्त; नायजेरियन नागरिकाला अटक

कुरियरच्या माध्यामातून सुरु होती स्मगलिंग

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत वेगवेगळ्या भागात कुरियरच्या माध्यमातून (courier) अंमली पदार्थांचं स्मगलिंग (Drugs smuggling) सुरु होतं. एनसीबीनं (NCB Raids) या मुंबईतल्या वेगवेगळ्या 8 ठिकाणी धाडी टाकून वेगवेगळ्या वस्तुंच्या पॅकेजेसमध्ये पाठवण्यात येणारे जवळपास 13 कोटींचे (Thirteen crore drugs seized) अमली पदार्थ जप्त केले आहेत. जवळपास 5 दिवस एनसीबीची रेड सुरु होती. चार वेगवेगळी ऑपरेशन्स करण्यात आली. यात एकूण 2.3 ग्रॅम एम्फेटामाईन, 3.9 किलो ओपीयम, 2.5 किलो झोलपिडीयम टॅबलेटस जप्त करण्यात आले आहेत.

पहिल्या ऑपरेशनमध्ये 490 ग्रॅम अँफेटाईम जप्त करण्यात आलं जे स्टेथेस्कोपमध्ये लपवण्यात आलं होतं. ते डोंगरीतून ऑस्ट्रेलियामध्ये पाठवण्यात येणार होतं. यात एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या ऑपरेशनमध्ये 3.906 ग्रॅम अफु जप्त करण्यात आला. जीमायक्रोवेव्ह ओवनमधून मालदिवला पाठवण्यात येत होती. त्यानंतर खाण्याच्या पादार्थांच्या पाकीटात पॅक केलेल 2.525 ग्रॅम झोलपीडीयम जप्त करण्यात आले जे अमेरिकेत पाठवले जात होते.

ऑपरेशनमध्ये 941 ग्रॅम अँफेटामाईन जप्त करण्यात आलं, जे सायकलचे हेल्मेटस आणि बांगड्यांमध्ये लपवण्यात आलं होतं. हे कन्साईनमेंट मुंबईतून ऑस्ट्रेलियात पाठवलं जात होतं. पाचव्या दिवशी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये 848 ग्रॅम अँफेटामाईन जप्त करण्यात आलं जेपाईप आणि टॉय बॉक्सेस मधून दुबई आणि न्युझीलंडला पाठवलं जात होतं. त्याचप्रमाणे1 टीबीच्या हार्डडिस्कमध्ये लपवलेलं 17 ग्रॅम अँफेटामाईन जप्त करण्यात आलं आहे. जे स्वित्झरलँड पाठवलं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT