murder sakal
मुंबई

Mumbai Crime: मालमत्तेच्या वादातून पत्नीची केली हत्या तर भावावर केला हल्ला

सकाळ डिजिटल टीम

पत्नीची हत्या करून आजारी भावावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. या हल्ल्यात चित्रा ड्रेसन डिसा या ३५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला तर डेमियन मार्कोस डिसा हा जखमी झाला आहे.

डेमियनवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी पती ड्रेसन मार्कोस डिसा याचा शोध सुरु केला आहे.

डेमियन हा मालाड परिसरातील एव्हरशाईन, पद्मानगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होता. डेमियनचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्या असून, त्याचे उपचार सुरू आहेत. त्याच्या औषधोपचारासाठी ड्रेसनने त्याची मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला होता. त्याला डेमियनसह ड्रेसनची पत्नी चित्रा हिचा विरोध होता.

त्याप्रकरणातून शुक्रवारी या तिघांमध्ये वाद झाला. या वादातून ड्रेसीनने डेमियनसह चित्राच्या डोक्यात मातीच्या फ्लावर पॉटने बेदम मारहाण केली. यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. यावेळी स्थानिकांनी धाव घेत जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे चित्राला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डेमियनची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी डेमियनची पत्नीचा जबाब नोंदविला असून पोलिस ड्रेसनचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT