मुंबई : मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा संपता संपत नाही. मुंबईतील रस्त्यांमध्ये अजूनही १४ हजार खड्डे असल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली. या खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण केली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याचा उपयोग झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
१ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत खड्ड्यांच्या ४८ हजार ६०८ तक्रारी पालिकेकडे आल्या. त्यापैकी मार्च २०२३ अखेरपर्यंत ३३ हजार ७९१ खड्डे कोल्डमिक्स व नवीन तंत्रज्ञानाने बुजवले. मात्र शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात अजूनही तब्बल १४ हजार ८१७ खड्डे शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पावसाळा तोंडावर आला तरी मुंबईच्या रस्त्यांतील खड्डे बुजलेले नाहीत.
गेल्या एप्रिल महिन्यांतील खड्ड्यांची आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आकडेवारीत मुंबई खड्डेमुक्त झाली की नाही हे दिसून येईल. नागरिकांना मोबाईल ॲपवर खड्ड्यांची तक्रार करता येणार आहे. ४८ तासांत खड्डे बुजवण्याची ग्वाही पालिकेने दिली आहे. @mybmc वर ट्वीट करता येईल किंवा mcgm.gov.in या वेबसाईटवर तक्रार करता येईल.
तसेच MCGM २४×७ हे ॲप सुरू केले असून प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री क्रमांक आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील १९१६ या क्रमांकासह व्हॅटसॲप चॅटबोटवरही तक्रार करता येईल, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.