मुंबई

संचिकाच्या मामाचा फोन आला आणि त्याने जे सांगितले, ते ऐकून संचिकाच्या पायाखालची वाळूच सरकली

अनिश पाटील

मुंबई, ता.12 : लालबाग येथील 20 वर्षीय तरुणीचे फेसबुक अकाउंट हॅक करून तिच्या कुटुंबातील व्यक्ती व मित्रमैत्रीणींना अश्लील व्हीडिओ पाठवून खंडणीची मागणी केल्याचं खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहे.

लालबाग येथे राहणारी तक्रारदार संचिका (नाव बदलले आहे) विद्यार्थिनी आहे. लॉकडाऊनमुळे मित्र-मैत्रीणींशी भेट होत नसल्यामुळे सर्व संपर्क मोबाईल व फेसबुकच्या माध्यमातून भेटत होते. सर्व सुरळीत सुरू असताना नुकतीच तिच्या मामाचा दूरध्वनी आला. त्याने जे काही सांगितले, ते ऐकून संचिकाच्या पायाखालची वाळूच सरकली.

तिच्या मामाला संचिकाच्या फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने संचिकाच्या नावाने अश्लील चित्रफीतही पाठवली. या धक्क्यातून संचिका सावरते, तोच तिच्या एका मित्राचाही दूरध्वनी आला. त्याच्य़ाशीही संचिकाच्या फेसबुक खात्यातून संपर्क साधून 50 हजार रुपयांची मागणी केली होती. हा खूप गंभीर प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर संचिकाने माहिती घेतली असता तिच्या काही मैत्रीणीसोबतची संचिकाच्या फेसबुकवरून चॅट करण्यात आले होते. त्यात मैत्रीणींशी अश्लील संभाषण करून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती.

या संपूर्ण प्रकारानंतर नुकतीच संचिकाने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी दिलेल्या मानसिक पाठबळानंतर तिने याप्रकरणी काळाचौकी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 385, 419, 420, 500, 509 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66 (क), 66 (ड), 67, 67 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात आरोपी सराईत वाटत असून ओळखीचा असण्याचा संशय पोलिसांना आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

mumbai crime news hacking of facebook and obscene talk with family and friends

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT