mumbai dabbawala file photo
मुंबई

मुंबईचे डब्बेवाले संकटात, ठाकरे सरकारमुळे आर्थिक कोंडी

'आम्हाला वाटलं होतं...'

दीनानाथ परब

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू झाले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन कठोर निर्बंध लागू झाले असले, तरी त्याचा अनेक घटकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यात मुंबईची ओळख असलेल्या डब्बेवाल्यांचा सुद्धा समावेश आहे. सरकारने कुठलेही मदत पॅकेज जाहीर न केल्याबद्दल मुंबईच्या डब्बेवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डब्बेवाल्यांचे मुंबईत अत्यंत प्रभावशाली नेटवर्क असून अचूक नियोजनासाठी ते ओळखले जातात.

जागतिक पातळीवर याची दखल घेतली असून मॅनेजमेंटच्या वर्गात मुंबईच्या डब्बेवाल्यांचे उदहारण दिले जाते. राज्य सरकारने रिक्षाचालक, नोंदणीकृत मजुरांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. "आमच्या व्यवसायात एकूण ५ हजार डब्बेवाले आहेत. कोरोनाच्या साथीमुळे फक्त ४०० ते ५०० डब्बेवाले काम करत होते. आता नव्या निर्बंधांमुळे फक्त २०० ते ३०० डब्बेवाले उरले आहेत" असे डब्बेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके म्हणाले. आम्ही आर्थिक मदतीसाठी सरकारला विनंती करत आहोत असे विष्णू काळडोके म्हणाले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

मागच्यावर्षी पहिल्या लॉकडाउनच्यावेळी डब्बेवाल्यांचे काम पूर्णपणे थांबले होते. पण निर्बंध शिथील झाल्यानंतर हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत होते. त्यात आता पुन्हा निर्बंध लागू झालेत. "मुंबईकरांसाठी काम करायचे आम्ही थांबवलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याला संबोधित केले, तेव्हा ते आमच्यासाठी काही मदत जाहीर करतील असे वाटले होते" असे विष्णू काळडोके म्हणाले. डब्बेवाले ही मुंबईची एक ओळख आहे. "घरगुती जेवणाचे दिवसाला सरासरी दोन लाख डब्बे ते कामाच्याठिकाणी पोहोचवतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT