ramakant panda  sakal
मुंबई

Mumbai: 'हार्टबिट्स' जगा आणि जगू द्या ! डॉ. रमाकांत पांडा यांच्या 'हार्टबिट्स' फोटोंचं प्रदर्शनाची रसिकांमध्ये चर्चा

सकाळ डिजिटल टीम

जागतिक किर्तीचे हृदयरोग तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या 'हार्टबीट्स' या वन्यजीव छायाचित्राचे प्रदर्शन नोव्हेंबरपासून जहाँगीर आर्ट गॅलरीत सुरु झाले आहे. पद्मभुषण पुरस्कार विजेत्या या हार्ट सर्जनने आतापर्यंत २९ हजार हृदयरोग शस्त्रक्रीया केल्या आहेत. एवढ्या व्यस्त दिनचर्येतून डॉ. पांडा यांनी फोटोग्राफीची आपली आवड जपली. या प्रदर्शनीत भारत आणि केनीयाच्या घनदाट जंगलात टिपलेल्या अडीच लाख फोटोपैकी निवडक १३० छायाचित्र ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक छायाचित्रामागे एक कथा असल्याचे पांडा सांगतात.

देशात डॉ.रमाकांत पांडा हे सर्वाधिक मागणी असेलेले हृदयरोग तज्ञ. लहानपणीपासून पांडा यांना वन्यजीव छायाचित्रणाची आवड होती. मात्र अलिकडे १० वर्षात ती अधिकच बहरल्याचे त्यांनी सांगीतले. जगात कामाचा त्राण, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. काम करणे गजरेजे आहे हे खर आहे मात्र स्वतासाठी आठवड्यातील दोन दिवस काढणे. आपल्या आवडीनिवडी जपा.त्यामुळे तणाव कमी होतो. हृदय सृदृढ राहते असे डॉ. पांडा यांनी सांगीतले. मी दोन दिवस जंगलात काढतो आणि मी तरोताजा होऊन येतो. असे पांंडा म्हणाले.

Collage for exhibition - Heartbeats - by Dr Ramakanta Panda

जंगल संवर्धनासाठी काम

डॉ. पांडा यांनी वन्यजीव फोटोग्राफीसाठी कान्हा राष्ट्रीय अभ्यारण्य,सातपुडा, बांधवगड व्याघ्र प्रकल्प तसेच भरतपूर आणि कर्नाळा पक्षी अभारण्याला भेटी दिल्या. तिथल्या वन्यजीव, जंगलाची देखभाल वनमजूर, संस्था अगदी मन लावून करतात.मात्र त्यांची परिस्थिती हलाखीची आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या कर्मचारी, मजूरांच्या मदतीसाठी त्यांनी एशियन वाईल्ड लाईफ ट्रस्ट स्थापन केला. 'हार्टबिट्स' प्रदर्शनीतून छायाचित्र विक्री, कॉफी टेबल बूक विक्रीतील सर्व पैसै या ट्रस्टला जाणार आहे. लवकरचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काम करणऱ्या सर्व वनमजूर, कामगारांना ब्लँकेटचे वाटप करणार असल्याचे पांडा यांनी सांगीतले.

संयम

सर्जरी करताना जसा संयम ठेवावा लागतो तसा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये ठेवावा लागतो. एकदा रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात आराम करत असलेल्या एका वाघाला क्लिक करण्यासाठी तब्बल ९ तास वाट पहावी लागली.४५ डिग्री तापमानात मी घामेजून गेलो. ९ तासानंतर मला तो फोटो घेता आला असे पांडा यांनी सांगीतले. एकदा एका तलावाजवळ पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघाला टिपण्यासाठी सकाळी ९ ते ४ पर्यंत बसून राहलो.आपल्या देशातील छायाचित्रणाचा अनूभव मस्त आहे. सोबत आफ्रीकेतील जंगलाचा अनूभव चित्तथरारक होता असे पांडा म्हणाले.

मुंबईतील पक्षीविविधता

या प्रदर्शनीत ठेवण्यात आलेले पक्ष्यांचे फोटो नवी मुंबई आणि कर्नाळा पक्षी अभ्यारण्य, मसाई मारा इथले आहे. हे छायाचित्र आम्हाला सांगतात की माणसासोबत वन्यजीव जगू शकतात.कर्नाळामध्ये ओरीएंटल किंगफीशर सुंदर पक्षी आहे. गेल्या पाच वर्षापासून मी त्याला टिपतो. त्यानंतर हा पक्षी एवढा लोकप्रिय झाला. की अनेक छायाचित्रकार दूरदूरुन त्याला टिपण्यासाठी कर्नाळा इथे येतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला. याचा अर्थ वन्यजीव संवर्धनातून प्रगती असा होतो. असे पांडा यांनी सागीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT