Uddhav Thackeray and aditya Thackeray  
मुंबई

Mumbai : कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी 15 ठिकाणी EDची छापेमारी ठाकरेंचे निकटवर्तीय रडारवर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोविड काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबईत १५ विविध ठिकाणी छापे टाकले.कोविड सेंटरच्या कथित घोटाळ्याशी संबधित मनी लॉंडरीग प्रकरणात सुजित पाटकर तसेच लाइफलाईन रुग्णालयाशी संबधित ठिकाणावर ईडीने हे छापे घातले.

सुजित पाटकर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात.युवा सेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्यासह सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली.

कोविड काळात सुजित पाटकर आणि तीन भागीदार यांना कोविड जंबो सेंटरचे व्यवस्थापन चालवण्याचे कंत्राट मिळाले होते. खोट्या कागदपत्राच्या आधारे हे कंत्राट मिळवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विस या कंपनीविरुध्द, पाटकर आणि त्यांच्या तीन भागीदाराविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल केले होते.

आझाद मैदान पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्हांच्या आधारावर या प्रकरणात झालेल्या मनी लॉडरींगच्या दिशेने ईडी चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात ईडीने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची चकशी केली होती.

ईडी अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्या घरावरही छापेमारी केली. सुरज चव्हाण हे युवा सेनेचे (ठाकरे गट) कोअर कमिटी सदस्य आहेत. याच प्रकरणात सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले. यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या घरावर ईडीचे पथक जावून धडकल्याचे सांगण्यात येत आहे.

छापे कुठे पडले

सुजित पाटकर, संजीव जयस्वाल आणि सुरज चव्हाण यांच्या अनुक्रमे सांताक्रूज, वांद्रे आणि चेंबुरच्या घरावर छापे पडले. जयस्वाल यांच्या वांद्रे इथल्या घरी गेल्या अनेक तासापासून ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत.

काय आहे आरोप

दाखल झालेल्या एफआयआर नुसार कोविड काळात वरळी, मूलूंड, दहिसर आणि पुण्यातील जबो कोविड केंद्रांचे कंत्राट मिळवण्यासाठी सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसने पालिकेला खोटा भागीदारी करार दाखवला. रातोरात या कंपन्या उभ्या केल्या.

वैद्यकीय क्षेत्रात कुठलाही पुर्वअनूभव नसताना सुजित पाटकर यांच्या कंपनीने कोविड केंद्र चालवण्याचे कंत्राट घेतले. २०२० मध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वरील आरोप करण्यात आले आहे.

या प्रकाराची चौकशी केल्यानंतर सदर कोविड केंद्रात काम करत असलेले कर्मचारी, डॉक्टर यांच्याकडे कुठलेही अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. रुग्णांवर इलाज करण्यास ते अपयशी ठरले. त्यामुळे अनेक रुग्णांना त्रास झाला असल्याचे या एफआयआरमध्ये सांगण्यात आले

मोठा बंदोबस्त

छापेमारी ज्या ठिकाणी सुरू होते तिथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला . तसेच कुणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत येण्यास मज्जाव केला होता. फोन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. ईडीकडून प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सुरज चव्हाण यांच्या घराजवळ शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांनी ईडी आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या. चव्हाण यांच्यावरची कारवाई ही राजकीय द्वेषातून झाली असल्याचा आऱोप शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केला आहे.

सुजित पाटकर हे संजय राऊतचे ते बिझनेस पार्टनर आहेत. या घोटाळ्या प्रकरणी त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे.

-किरिट सोमय्या, भाजप नेते.

उध्दव ठाकरे यांची घौडदौड रोखण्यासाठी हा ठरवून केलेले प्रकार आहे. जे नेते शिवसेनेतून शिंदे गटात आणि भाजपमध्ये गेले, त्या लाभार्थ्यांचे काय. तूम्हाला खरोखर तपास करायचा असेल. दुसऱ्या गटात जावून कातडी वाचवणाऱ्या नेत्यांची चौकशी व्हायला हवी.

- संजय राऊत, शिवसेना नेते

नेमकी काय कारवाई चालली आहे. मला माहिती नाही.मात्र ही चौकशी सुरु होती. त्यातून काय सापडले ही ईडीच सांगू शकले

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT