Mumbai Fire Accident cylinder explosion Fire at Saifi building in Byculla two children and citizens rescue esakal
मुंबई

Mumbai Fire Accident : सिलिंडर स्फोटाने परिसर हादरला; भायखळा येथील सैफी इमारतीत आग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भायखळा पश्चिम शकील स्ट्रीट ३ येथील तळ अधिक तीन मजली सेफ इमारतीच्या तळ मजल्यावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. काही मिनिटातच आग वाऱ्या सारखी पसरली आणि शेजारील जुबली आणि धोबीघाट या दोन इमारतींना आगीची झळ बसली.

या घटनेत दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसर हादरला. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन लहान मुलांसह महिला व पुरुषांना सुखरुप बाहेर काढल्याचे मुंबई अग्निशमन दलाने सांगितले.

शकील स्ट्रीट ३, हयात मेडिकल स्टोअर्स जवळ भायखळा पश्चिम येथील तळ अधिक तीन मजली सैफी इमारतीच्या पाच ते सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या तळ मजल्यावर भीषण आग लागली.

काही वेळात आग वाऱ्या सारखी पसरली आणि शेजारील तळ अधिक तीन मजली जुबली आणि तळ अधिक तीन मजली धोबीघाट या दोन इमारतींना आगीची झळ बसली. या दुर्घटनेत सैफी स्ट्रीट इमारतीत असलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढणे हा मुख्य उद्देश ठेवून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या वेळी दोन लहान मुलांसह महिला व पुरुष असे ९ जण अडकल्याचे समजले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अडकलेल्या ९ जणांना सुखरुप रेस्क्यू केल्याचे सांगळे यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी या घटनेची स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण!

सैफी इमारतीत लागलेल्या आगीत इमारतीतील वायरिंग, लाकडी सामान, बॅग, प्लास्टिक जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याचे त्यांनी सांगितले. बकेट कंपाऊंड मध्ये सैफी इमारत जुनी असून इमारतीत लाकडी बांधकाम अधिक आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास सैफी इमारतीच्या तळ मजल्यावर आग लागली. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सैफी इमारतीच्या शेजारी असलेली जुबली व धोबीघाट इमारतीत आग पसरली. मात्र कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याचे पालिकेच्या बी विभागाचे सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT