मोनिका मोरेला लोकल अपघातात गमवावे लागले होते दोन्ही हात
मुंबई: 2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया 28 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. याकरता 32 वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून तिला हे हात मिळाले असून ते चेन्नई वरून येथे आणण्यात आले होते. त्यानंतर आता मोनिकाच्या हातांमध्ये संवेदना आणि ताकद आल्याने ती आता हातांची हालचाल आणि छोटी मोठी काम करत असल्याचे दिसले. (Mumbai’s first hand transplant operation as Local Train victim Monika More gets wings)
मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपित केले गेले होते. यशस्वी हात प्रत्यारोपित होणारी मोनिका ही पहिलीच मुलगी आहे. या प्रत्यारोपणानंतर तिला फिजिओथेरपी आणि व्यायाम दिला गेला होता. त्या फिजिओथेरेपीला मोनिकाने उत्तम प्रतिसाद दिला असून ती हाताने आता छोटी-मोठी काम करत आहे.
दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मोनिकाची भेट घेतली आणि तिची विचारपूस केली. किरीट सोमय्या यांनी ट्विट केले होते की, ट्रान्सप्लांट केलेल्या मानवी/स्वतःचा दोन हातांनी मोनिका मोरे नी मला पाणी दिले, आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे.
दोन्ही हातांनी काम शक्य- मोनिका मोरे
"2014 ला रेल्वे अपघातात दोन्ही हात गेले. ऑगस्ट 2020 मध्ये मानवीय हात प्रत्यारोपित करण्यात आले. आत्ता दोन्ही हात सामान्य माणसांच्या हाताप्रमाणे काम करू लागले असून छोटी- मोठी काम करते. मला खूप आनंद होत आहे. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की कधी मी स्वतःहून काम करु शकेन. पण, आता करत आहे. सहा महिन्यांनी लिहूही शकेन", असे मोनिकाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.