पाणी  sakal
मुंबई

Mumbai : पहिल्याच पावसात त्रेधा ! सखल भाग पाण्यात; मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

शहराच्या सखल भागांत पाणी साचल्याने पादचाऱ्यांबरोबरच वाहनचालकांचे हाल झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसाने आज काहीसा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर दुपारपासून दमदार हजेरी लावली. शहराच्या सखल भागांत पाणी साचल्याने पादचाऱ्यांबरोबरच वाहनचालकांचे हाल झाले. मुंबईकरांची तारांबळ उडाली. लोकल सेवाही १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होती.

दरम्यान, ४८ तासांत मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने येत्या २४ तासांत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मुंबईबरोबरच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे मुंबई पडझडीच्या घटना घडल्या. शहरात १५ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. एका ठिकाणी घराचा काही भाग कोसळला. काही ठिकाणी शॉर्ट सर्किटच्याही घटना घडल्या. संध्याकाळी पाचनंतर मुंबईच्या अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले, विक्रोळी इत्यादी परिसरात जोरदार पाऊस कोसळला. मध्य, पश्चिम आण हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

पाणी साचल्याने तारांबळ

पहिल्यात पावसात शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. अंधेरी सब-वे पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. एकाच वेळी पाच ते सहा वाहने पाण्यात अडून पडल्याने दोरीच्या मदतीने ती बाहेर काढावी लागली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.

मुंबई वाहतूक पोलिस आणि महापालिकेने वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अंधेरी पूर्वेतील असल्फा साकीनाका जंक्शन परिसरात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली होती. वरळी सी-लिंक गेटजवळील गफार खान रोड पाण्यात गेल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT