मुंबई - मुंबईतील अंधेरीच्या अंबोली भागात एका विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी मनीष गांधी नावे आरोपी फरार असून आंबोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्कार पिडीत महिला पोलंडची नागरिक आहे . या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनिष गांधी याने आपल्या नोव्हेंबर 2016 ते 2022 या कालावधीत अनेकदा बलात्कार आणि लैंगिक शोषण केलं आहे तसंच मनिष गांधी मला ब्लॅकमेल करत होता असंही या पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.
घटनाक्रम
पीडित महिला नोकरी निमित्त पोलंडहून भारतात आली होती. पिडीत महिला अंधेरीतील खाजगी कंपनीत कार्यरत होती. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. मात्र, मनिष गांधी पीडितेला त्रास देऊ लागला.
तिच्या मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाठवून तिच्याशी जवळीक साधू लागला. त्यानंतर, जर्मनीमध्ये एका प्रदर्शनासाठी दोघेही गेले होते. तेथे एका हॉटेलवर मनिषने पीडितेवर बलात्कार केला. या काळात त्याने तिचे अनेक अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडीओ दाखवून तो तिला धमकावत असे.
सात वर्षे शोषण
2016 ते 2022 दरम्यान सात वर्षे सातत्याने आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. या काळात तिने तिच्या मायदेशी परत जाण्याचाही निर्णय घेतला. परंतु, तिच्याकडील सर्व आवश्यक कागदपत्रे मनीष गांधी याने काढून घेतल्याने ती परत पोलंडला जाऊ शकत नव्हती.
या सर्व प्रकारामुळे पीडिता अत्यंत तणावात गेली. अखेर तिने आपल्या वकिलांच्या मार्फत अंबोली पोलीस ठाण्यात मनीष गांधीविरोधात तक्रार दाखल केली. यासाठी तिने सर्व फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सही पोलिसांना सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.