Mumbai Fraud - विविध योजनांमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष दाखवत पतपेढीच्या संचालकांनी 47 ग्राहकांना 17 लाख 36 हजार रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करत पतपेढीचा मॅनेजर व 3 संचालकांना अटक केली आहे. शाखा मॅनेजर सागर शंकर डोंगरे, संचालक राजेंद्र शंकरराव चोपडे, संचालक भास्कर कोंडाजी बिन्नर आणि संचालक विष्णु बाळू दिनकर अशी अटक आरोपींची नावे आहेत.
डोंबिवली पूर्वेतील चार रस्त्याजवळ आर पी रोडवर श्रमसंपदा निधी लिमिटेड नावाची पतपेढी होती. या पतपेढीत विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवण्याचे आमिष येथील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना दाखविले.
या आमिषाला भुलून 47 हजार ग्राहकांनी दैनंदिन ठेवी, आरडी, एफडी स्वरुपात 1 फेब्रुवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 17 लाख 36 हजार 441 रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर ग्राहकांना कोणताही परतावा न देता पतपेढीचे संचालक मंडळ आणि शाखा मॅनेजर पतपेढीला टाळं मारुन फरार झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्राहक परशुराम मेढेकर यांच्या फिर्यादीवरुन पतपेढीचे संचालक आणि शाखा मॅनेजरविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप यांच्या पथकाने तपास करत चारही जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.