Anant Chaturdashi esakal
मुंबई

Mumbai Ganpati Festival : बाप्पाच्या आगमनासाठी सजली मुंबई ; रस्त्यांवर गर्दीच गर्दी

Chinmay Jagtap

Ganpati Festival : लालबाग, चिंचपोकळीमधील मंगलमूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जल्लोषात आगमन झाले. या आगमन सोहळ्यासाठी मुंबई तसेच बाहेरील भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मुंबईत मूर्तींच्या आगमन मिरवणुकांनी ठिकठिकाणी चक्का जाम झाला होता. त्यामुळे काही मार्ग अन्यत्र वळवले होते. ‘बेस्ट’चीही कोंडी झाली होती.

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळांनी जोरदार तयारी केली आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे हे १०४ वे वर्ष आहे. दरवर्षी या गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात होते.

लालबाग-चिंचपोकळीमध्ये आगमन मिरवणुका निघाल्या होत्या. लालबाग, चिंचपोकळी ते कॉटन ग्रीनपर्यंतचे रस्ते फुलून गेले होते. मुंबईत ठिकठिकाणी चक्का जाम झाला होता. त्यामुळे काही मार्ग अन्यत्र वळवले होते. बेस्टचीही कोंडी झाली होती. मंडपांत गेल्या आठवड्यापासून गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

सकाळपासूनच मुंबईभरातून गणेशभक्त येण्यास सुरुवात झाली. दुपारी आगमन मिरवणूक निघाली तेव्हा मोठी गर्दी झाली. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहचत असतात. यंदाही मोठी गर्दी झाली.

आगमनाच्या मिरवणुकीला आलेल्या भाविकांनी आगमन सोहळ्यात सहभाग घेतला. गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी आरोग्य सेवाही उपलब्ध केली होती. आज दुपारपासून सुरू झालेला आगमन सोहळा संध्याकाळपर्यंत सुरू राहिला. ठिकठिकाणी त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT