mumbai sakal
मुंबई

Mumbai : गोदरेजच्या खारफुटी संवर्धाचा आदर्श

खारफुटी संवर्धनाचा विक्रोळीत आदर्श! ‘गोदरेज’निर्मित देशातील पहिल्या ‘आयएसओ’ प्रमाणित वनाची 130 देशांत कीर्ती

सकाळ डिजिटल टीम

नितीन बिनेकर

मुंबई : विक्रोळीतील साधारणता तीन हजार एकर जमिनीवर गोदरेज कंपनीने संवर्धन केलेल्या खारफुटीने देशासमोर नव्हे; तर जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. खारफुटीच्या संशोधनासाठी कंपनीने विद्यार्थी आणि संशोधकांसाठी निःशुल्क 'मॅन्ग्रोव्ह अॅप' तयार केले आहे. जगभरातील १३० देशांत ते वापरले जात आहे. विक्रोळीच्या खारफुटी संवर्धनाची कीर्ती ऐकून ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स  आणि सध्याचे ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनीही तिथे भेट दिली होती.

गोदरेज कंपनीची स्थापना १८९७ मध्ये झाली. व्यवसायवृद्धीसाठी कंपनीने तत्कालीन सरकारकडून १९४० च्या दशकात विक्रोळी गावातील जमीन विकत घेतली. कंपनीने अत्याधुनिक यंत्रसामुग्री परदेशातून आणण्यासाठी विक्रोळी खाडीत जेट्टी उभारली. ठाण्याच्या खाडीतून थेट विक्रोळीत मशीन आणण्यासाठी जेट्टीचा उपयोग झाला. त्या जमिनीमध्ये ठाणे खाडीलगतच्या खारफुटीचे जंगल होते. त्यात विविध माशांच्या प्रजाती, जैवविविधता आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास होता. जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी गोदरेजने पुढाकार घेतला. १९८५ मध्ये ठाणे खाडीच्या पश्चिम तटावरील विक्रोळी खारफुटींचे संरक्षण आणि संवर्धनासाठी गोदरेजने ‘सुनाबाई पिरोजशा गोदरेज फाऊंडेशन'ची स्थापना मोहीम सुरू झाली.

विक्रोळी पूर्व परिसरापासून ठाण्याच्या खाडीपर्यंत खारफुटी पसरलेली आहे. १९८५ पासून जेव्हा कंपनीने खारफुटीचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम सुरू केले, त्या वेळी त्यासंदर्भात फार कमी माहिती उपलब्ध होती; मात्र सोहराबजी गोदरेज स्वतः पर्यावरणप्रेमी होते. खारफुटीचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी काही तज्ज्ञ मंडळींशी संपर्क साधला. एक विशेष पथक त्यांनी तयार केले. त्या पथकात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अलीसुद्धा होते. पथकाने खारफुटी संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर सतत संशोधन, संवर्धन आणि जनजागृती, अशी तिहेरी रणनीती घेऊन गोदरेजने काम केले. त्या कामामुळे १९९७ मध्ये खारफुटीला देशातील ‘आयएसओ १४००१' प्रमाणित वनाचा बहुमान मिळाला.

विक्रोळी पूर्व परिसरापासून ठाण्याच्या खाडीपर्यंत खारफुटी पसरलेली आहे. १९८५ पासून जेव्हा कंपनीने खारफुटीचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम सुरू केले, त्या वेळी त्यासंदर्भात फार कमी माहिती उपलब्ध होती; मात्र सोहराबजी गोदरेज स्वतः पर्यावरणप्रेमी होते. खारफुटीचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी काही तज्ज्ञ मंडळींशी संपर्क साधला. एक विशेष पथक त्यांनी तयार केले. त्या पथकात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अलीसुद्धा होते. पथकाने खारफुटी संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर सतत संशोधन, संवर्धन आणि जनजागृती, अशी तिहेरी रणनीती घेऊन गोदरेजने काम केले. त्या कामामुळे १९९७ मध्ये खारफुटीला देशातील ‘आयएसओ १४००१' प्रमाणित वनाचा बहुमान मिळाला.

अनेक अडचणींवर मात

'गोदरेज ॲण्ड बॉईज' कंपनीच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य अधिकारी तेजश्री जोशी यांनी सांगितले, की विक्रोळीतील खारफुटीमध्ये पूर्वीपासून मासेमारी करणारे कुटुंब होते. त्यांची संपूर्ण कंपनीने पांरपरिक मासेमारी बंद न करता त्यांनाही खारफुटी संरक्षण-संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी करून घेतले. पूर्वी २५ कुटुंबे तिथे मासेमारी करत होती. त्यांची संख्या ५० च्या वर पोहोचलेली आहे. सर्वांचे खारफुटीच्या संरक्षणात मोठे योगदान आहे, असेही त्या म्हणाल्या.

इतर खारफुटींच्या संवर्धनाची गरज मुंबई आणि उपनगरातील खारफुटी जगलांची परिस्थिती आज वाईट आहे. त्यामुळे समुद्री जीवांची संख्याही कमी होत आहेत. त्याचा थेट परिणाम मच्छीमारांवर होत आहे. परंतु, विक्रोळी खाडीमध्ये माशांच्या प्रजननासाठी नर्सरी म्हणून काम करणाऱ्या खारफुटीमुळे येथे टिकून आहे. गोदरेज खारफुटीप्रमाणे इतरही कांदळवनाचे संवर्धन होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

१६०० हून अधिक प्रजाती

- गोदरेज कंपनीकडून १९९० पासून विक्रोळी खारफुटी जंगलातील बायो डायव्हर्सिटी मॅपिंग केले जात आहे. दरवर्षी गोदरेजकडूनही मॅपिंग केले जात आहे. नवनव्या प्रजातींचे पक्षी आणि समुद्रजीव वाढत असल्याची नोंद त्यातून होत आहे. आतापर्यंत २०९ प्रजातींचे पक्षी, फूलपाखरांच्या ८२ जाती, ७६ कोळी, ७४ छोटे जलचर, २० प्रकारचे साप इत्यादी १६०० हून अधिक विविध वनस्पती, प्राणी, पक्षी आणि कीटकांची नोंद खारफुटीत झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

हवेची गुणवत्ता राखण्यास मदत-

दोन वर्षांच्या संशोधनानुसार गोदरेज खारफुटी खारफुटीचे जंगल दरवर्षी ६० हजार टन कार्बन साठवते. त्यामुळे हवेची गुणवत्ता राखण्यास मदत होते. खारफुटीमुळे जटिल प्रदूषकांचे विघटन करून त्यांचे पोषक द्रव्यांमध्ये रूपांतरण होऊन मुंबईच्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यास मदत होत आहे.

आशिया खंडातील पहिले अॅप -

खारफुटीचे संवर्धन, संरक्षण आणि सखोल संशोधन व्हावे यासाठी गोदरेज विद्यार्थी आणि संशोधकांना प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे खारफुटीच्या जंगलात जाऊन संशोधन करणे अवघड असते. हे लक्षात घेऊन गोदरेजने 'मॅन्ग्रोव्ह ॲप' तयार केले आहे. खारफुटीच्या अभ्यासासाठी विकसित केलेले हे आशिया खंडातील पहिले अॅप ठरले आहे. १३० देशांत हे ॲप वापरले जाते. स्थानिक भाषेतही ते उपलब्ध करून दिले गेले आहे, अशी माहिती तेजश्री जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT