mumbai goregaon fire news 
मुंबई

कुणाच्या आईची सावली हरवली, कुणाची भाची गेली तर कुणाच्या घराचा आधार गेला... आगीमुळे अनेकांच्या आयुष्यात वनवा

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका सहा मजली इमारतीला काल (गुरुवार) रात्री उशिरा भीषण आग लागली. ज्यामध्ये एकूण ५० जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ३५ जणांवर उपचार सुरू असून ४ जखमींना घरी सोडण्यात आले आहे.

आगीमुळे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली अनेक वाहनेही जळून खाक झाली. यामध्ये ४ कार आणि सुमारे ३० दुचाकींचा समावेश आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

या आगीत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. दोन मुलांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे सावली दूर झाली. तर दोन वृद्धांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

आईची सावली हरवली -

या घटनेत थापा कुटुंबातील सदस्य बिष्णू थापा (40) यांचा मृत्यू झाला. तसेच दोल मुलांच्या आईची सावली हरवली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पहिल्या मजल्यावर राहत होती. या कुटुंबात महिलेचा पती आणि त्यांची दोन राहत होते. दोन मुलं आणि मृत महिलेच्या पतीवर उपचार सुरु आहेत.

तो देवदूत ठरला -

संजू  तुषमढ यांनी आपल्या रुग्णवाहिकेच्या मदतीने अनेक रुग्णांची सुटका करून त्यांना वेळीच रुग्णालयात नेले. संजू यांनी सांगितले की, मी जवळच्या इमारतीत राहतो. आग लागल्याचे आणि लोक अडकल्याचे कळताच मी तातडीने रुग्णवाहिका घेऊन तेथे पोहोचलो. त्यावेळी एक १०८ रुग्णवाहिका व एक माझी एक रुग्णवाहिका उपलब्ध होती. आम्ही ताबडतोब सर्वांना दवाखान्यात नेले.

माझे हात भाजले, पण वाचलो-

या अपघातात तिसऱ्या मजल्यावर राहणारा मलंग मुरलीधर माला यांचा जीव थोडक्यात बचावला. मलंगने सांगितले की, आग लागली तेव्हा मी माझ्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन इमारतीच्या बाहेर आलो. पण माझी पत्नी आत होती. त्यानंतर, आम्ही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कळवले आणि त्यांनाही बाहेर काढण्यात आले. या घटनेत मी जखमी झालो.

ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, पीडितांना दुपारी साडेतीन वाजता रुग्णालयात आणण्यात आले. ६ नागरिकांचे मृतदेह आधी आणले होते.  सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४ रुग्ण आयसीयूमध्ये असून ३ जणांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धुरामुळे गुदमरून बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाला.

मुलांनी खिडकी तोडून कुटुंब बाहेर काढले-

लता महेता यांच्या १७ वर्षीय भाचीचा या दुर्घनेत मृत्यू झाला. त्यांनी प्रशासनाला यावरून धारेवर धरले. "अडीच वाजता धुरात कोंडलेल्या माझ्या आईचा फोन आला. माझ्या खिडकीतून आग लागलेली दिसते आहे. आम्हाला वाचवा,असे आई ओरडत होती. आम्ही 10 मिनिटात इथे पोहोचलो. १ तास उलटून गेला अग्निशमन दलाची गाडी इथे आली नाही. माझी दोन मुलं शिडी आणून वर चढले. खिडकी उघडली  सर्वांना खेचून बाहेर काढलं. माझी भाची जागेवर मृत होती. १७ वर्षांची तरुण भाची गेली. वहिणी आणि आई ऑक्सिजनवर आहेत. याला जबाबदार प्रशासन आहे", असे त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

"१६ वर्षे झाले माझा भाऊ या इमारतीसाठी लढतोय. या इमारतीत पाण्याची सोय नाही, माझ्या भावाने दागिने गहाण ठेवून इमारतीसाठी पाणी यावं म्हणून त्याने अधिकाऱ्यांना पैसे दिले. मात्र अजून इथे पाणी आले नाही. इथे इतकी गैरव्यवस्था आहे कोणीही डोकावून बघितलं नाही. माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावा इतकीच सरकारकडे मागणी आहे", असेही त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT