stamp duty sakal
मुंबई

मुंबई: गृहस्वामिनींसाठी सरकारचे प्रोत्साहन

घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

- दीपा कदम

मुंबई: बाईच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा लाभ राज्यात पाच हजार १२७ महिलांनी घेतला आहे. महाराष्ट्र राजमाता गृहस्वामिनी योजनेसाठी राज्य सरकारला १६७ कोटी महसुलावर पाणी सोडावे लागले असले तरी महिलेच्या नावावर आवर्जून घर घेण्यास त्यामुळे प्रोत्साहन मिळत असल्याने नवीन आर्थिक वर्षातही ही योजना राज्य सरकारने सुरु ठेवली आहे.

बाईच्या नावावर घर खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असला तरी आश्वासक असल्याने २०२२ -२०२३ मध्ये देखील ही योजना सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी होत असल्याने नवीन आर्थिक वर्षात घर खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा सात हजार ५२५ घरांची नोंदणी महिलेच्या नावावर होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विभागाला २३५ कोटी महसुलाचा तोटा होणार आहे.

सुरक्षितेसाठी निर्णय

बाईच्या नावावर घर खरेदी केले गेले तर तिला मिळणारी सुरक्षितता देखील आपोआपच वाढते, या कल्पनेतून अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२१ -२०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र राजमाता गृहस्वामिनी योजना जाहीर केली होती. ग्रामीण भागामध्ये बाईचे नाव घराच्या पाटीवर लिहिण्याची मोहिमदेखील सुरु आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून बाईच्या नावावर घर खरेदी करण्याच्या या योजनेकडे पाहिले जात आहे.

मुद्रांक शुल्कासंबंधी कठोर अटी

मुद्रांक शुल्काचा लाभ घेण्यासाठी बाईच्या नावावर घर खरेदी करुन ते पुन्हा पुरुषाच्या नावावर केले जाऊ नये यासाठी या योजनेत कठोर अटी घातलेल्या आहेत. सरकारच्या अटीनुसार महिलांनी मुद्रांक शुल्कातील सवलतचा लाभ घेतला तर संबंधित महिलेला तिचा फ्लॅट, सदनिका, रो-हाऊस आदी खरेदी केल्यापासून १५ वर्षांच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदारास विकता येणार नाही. महिला खरेदीदाराने जर या नियमाच्या बाहेर जाऊन अशाप्रकारे विक्री केल्यास कमी भरलेले एक टक्का मुद्रांक शुल्क भरावे लागतो आणि दंड देखील भरावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT