Mumbai Puranpoli Ghar sakal
मुंबई

Gudi Padwa Celebration : गुढीपाडव्याला पुरणपोळी, श्रींखडावर मुंबईकरांचा ताव

मुंबईत आज सर्वत्र गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. असेही म्हणतात की पुरणपोळी, श्रीखंड इतर गोडधोड पदार्थाशिवाय गुढीपाडवा पूर्णच होत नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत आज सर्वत्र गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. असेही म्हणतात की पुरणपोळी, श्रीखंड इतर गोडधोड पदार्थाशिवाय गुढीपाडवा पूर्णच होत नाही.

मुंबई - मुंबईत आज सर्वत्र गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. असेही म्हणतात की पुरणपोळी, श्रीखंड इतर गोडधोड पदार्थाशिवाय गुढीपाडवा पूर्णच होत नाही. यावेळी इतर मिठाईच्या प्रकारापेक्षा पुरणपोळी, श्रींखडाला ग्राहकांकडून जोरदार मागणी होती. पांरपारीक मिष्टाने विकणाऱे लाडू सम्राट आणि परळमधील गौरीशंकर छितरमल तसेच कांदिवलीतल्या पुरण पोळी घरासह घरघुती भाजीपोळी केंद्रात नागरिकांनी गोड पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कांदिवलीतील पुरणपोळी घरातून गुढीपाडव्याला दिवसभरात २५ हजार पुरण पोळ्यांची विक्री झाली. अलिकडे नावारुपास आलेल्या चिराग पृथरण यांच्या या केंद्रात तब्बल २० विविध प्रकारच्या पुरणपोळ्या तयार केल्या जातात. शुध्द तुप ,९५ टक्के रवा आणि ५ टक्के मैद्याचा पुरणपोळीसाठी वापर केला जातो, त्यामुळे इथल्या पुरणपोळी चवीष्ट आहे. यापुर्वी होळी सणाला ४० हजार पुरण पोळी विकल्या गेल्या होत्या. गुढीपाडव्याला पुरणपोळ्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे आज सकाळपासून आम्ही सज्ज होतो असं चिराग यांनी सांगीतले.

५६ वर्षाची पंरपरा जपणाऱ्या लालबागच्या लाडु सम्राटमध्ये आज लोकांची मोठी गर्दी होती. पुरणपोळी, लाडू आणि विविध प्रकारच्या श्रीखंडची जोरात विक्री झाल्याचे त्यांनी सांगीतले. होळी, गुढीपाडवा नंतर रामनवमी, अक्षयतृतीय, वटपौर्णिमा, गणपती, दिवाळी आणि दसरा या सर्व सण उत्सवामूर्ती श्रीखंड, बासुंदी आणि लाडू मोठी मागणी असते. गुढीपाडव्याच्या दिवशी केसर, ड्रायफूड, पुष्पखंड, स्ट्रॉबेरी, आम्रखंड अशा विविध प्रकारचे श्रींखड विक्रीसाठी ठेवले गेले होते.

गुढीपाडवा हा श्रीखंड-पुरी आणि पुरणपोळीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे श्रीखंड घेण्यासाठी नागरिकांनी गौरीशंकर मिठाईच्या दुकानात मोठी गर्दी केली. यावेळी विविध प्रकारचा मिठाई, जिलेबी या पांरपारीक मिष्टान्नाला बगल देऊन नागरिकांनी श्रीखंड आणि पुरणपोळीला प्राधान्य दिल्याचे गौरीशंकर छितरमल मिठाईवाला दुकानातील कर्मचारी नेमीचंद भंगेल यांनी सकाळला सांगितले. इतर दिवशी नागरिक मिठाई आणि अन्य स्वीट खरेदी करतात.

गुढीपाडवानिमित्त मोठ्या प्रमाणात पुरणपोळी तयार केल्या होत्या. ग्राहकांच्या सोयीसाठी पुरणपोळीचे पॉकेट तयार केले आहे. दोन पुरणपोळीचे पॉकेट ६० रुपयात विक्री करत आहे. त्याला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगीतले.

देवघर व गुढी सजावटीपासून ते रस्तोरस्ती काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्त गेंडा व झेंडुच्या फुलांना अधिक महत्व आहे. यात पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडुच्या फुलांची जास्त मागणी आहे. इतर वेळी ८० ते १०० रुपये किलो दराने मिळणारा झेंडू गुढीपाडव्याचा दिवशी १५० ते २०० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. फुलांची भाववाढ झाली असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याची प्रतिक्रिया फुलविक्रेते रोहित आजगांवकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT