मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना किंवा आधीपासूनच सहव्याधी असणाऱ्यांमध्ये स्वास्थ्याविषयी गंभीर समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातच एक महत्वाची समस्या म्हणजे मधुमेह. मधुमेह आधीपासून असलेल्यांमध्ये गंभीर गुंतागुंत आणि ज्यांना कधीच मधुमेह नव्हता अशांना नव्याने मधुमेहाची समस्या भेडसावत आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास होता त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्याचे डाॅक्टरांना आढळून आले आहे असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वरिष्ठ निवासी अधिकारी आणि मधुमेह तज्ज्ञ डाॅ.गोकुळ भोले यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात 400 दशलक्ष हूनही अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार पाहून काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातही कोरोनातुन बरे झालेल्या तरुणांना 40 टक्के नव्याने मधुमेहाच्या तक्रारी दिसल्या आहेत असेही डाॅ. भोले यांनी सांगितले.
धक्कादायक ! भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा 'त्या' शब्दाने उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला कारवाईचा इशारा
मधुमेह रूग्णांनी त्यांच्या आरोग्याच्या समस्येचा धोका टाळण्यास सहसा त्यांची रक्तातील साखर तपासणी करावी. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा वेग जरी कमी झाला असला तरी मधुमेह रूग्णांनी वेळोवेळी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासावी.
कोरोनातुन बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात विषाणू विरोधात अँटीबॉडी तयार होतात, त्यामध्ये इम्युनिटी ऍक्टिव्हेशन जास्त असते. त्यामुळे त्यांच्या अँटीबॉडीजचे रिऍक्शन होऊन आणखी मधुमेह वाढण्याची शक्यता असते, साखर नियंत्रित न झाल्यामुळे इतर आजार जसे न्यूमोनिया, फुफुसांचा आजार होऊन फुफुसात फायब्रोसिस तयात होणे त्यामुळे श्वसनाचा त्रास यासारखे आजार होतात. हे कायमस्वरूपी बदल फायब्रोसिस मुळे होतात आणि फायब्रोसिस हे मधुमेहाचे प्रमाण वाढण्यास अधिक कारणीभूत ठरते, त्यामुळे पोस्ट कोविडमध्ये श्वसनाचा त्रास होणे, दम लागणे अशा समस्या उद्भवतात. यावर आता उपचार ही केले जातात. काही अशी औषध जी फायब्रोसिस शरीरात वाढण्याचा वेग कमी करतात. त्यामुळे, कोरोनानंतर पोस्ट रिकव्हरी खूप महत्वाची असते कारण फायब्रोसिस हा दिर्घकाळ राहू शकतो. फायब्रोसिसचे प्रमाण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जास्त आहे.
महत्त्वाची बातमी : मालदीवमध्ये राष्ट्रपती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चक्क एका शहाळ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं
4 आठवड्यानंतर लक्षणे दिसतात -
साधारणतः कोरोना झाल्याच्या चार ते 6 आठवड्यानंतर पोस्ट कोविडची लक्षणे दिसू लागतात. त्यात वाढलेला मधुमेह, फायब्रोसिस, अस्तित्वात असलेल्या अस्थमा ही बळावला जातो. काही लोकांना दिर्घकाळापर्यंत ऑक्सिजन द्यावा लागतो. काहींना डिस्चार्जनंतर घरी ही ऑक्सिजनची गरज भासते.
मधुमेह आणि औषध -
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारांत वापरल्या जाणार्या औषधांचा ही मधुमेह वाढवण्यात किंवा नव्याने होण्यास कारणीभूत ठरतात. स्टेरॉयड घेतल्यामुळे संसर्गाचा परिणाम कमी होतो पण, रोगप्रतिकारक शक्तीवर ही परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने क्राॅस इन्फेक्शन होऊ शकतात.
25 टक्के तरुणांना मधुमेहाचा त्रास -
उपचारांसाठी दाखल झालेल्या 25 टक्क्यांपर्यंत लोकांना विशेषतः तरुणांना नव्याने मधुमेहाचा त्रास उद्भवला आहे. तर, ज्यांना आधीपासूनच मधुमेह होता असे किमान 40 टक्के लोक आहेत ज्यांची साखर अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
तात्काळ निदान आणि उपचार -
जर मधुमेह वाढला किंवा नव्याने आढळून आला असेल तर तात्काळ निदान आणि उपचार घेणे आवश्यक आहे. ज्यांना इतर सहव्याधी आहेत त्यांनी व्यायाम करावा आणि आहार चांगला घ्यावा असाही सल्ला डाॅ. भोले यांनी दिला आहे.
mumbai health news 25 percent of youngsters who were covid positive are facing problem of diabetes
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.