ऑक्‍टोबर हीटचा वाढणार जोर! 'अशी' घ्या काळजी Canva
मुंबई

Mumbai Health News: मुंबईकरांनो काळजी घ्या; हवामान बदलामुळे होऊ शकतो... !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Health News : सध्या हवामान होणारे बदलामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महानगराचे सध्याचे तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील दोन दिवस मुंबईच्या काही भागात अवकाळी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसे झाल्यास उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेलच, पण विषाणूजन्य आजार आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

हवामानात अचानक बदल झाल्यास, तापमानात वाढ असो किंवा अवकाळी पाऊस, शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागतो. यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, ते हा बदल बऱ्याच प्रमाणात सहन करू शकतात; परंतु ज्यांना इतर आजार आहेत आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्या समस्या वाढतात.

उच्च तापमानामुळे, लोक स्ट्रोक, हायपरटेन्शन, गंभीर निर्जलीकरण आणि त्यामुळे साखरेच्या पातळीत चढ-उतार यासारख्या आरोग्य समस्यांना बळी पडू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई उपनगराचे कमाल तापमान ३४.७ अंश; तर शहराचे ३१.३ अंश इतके नोंदवले गेले. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी लोकांना हायड्रेशनकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. केईएम रुग्णालयाचे डॉ. तुषार बंडगर म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णासाठी साखरेची पातळी राखणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत तापमान इतके वाढले आहे की, रुग्णामधील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास लघवीद्वारे शरीरातील पाणी निघून जाते. वारंवार लघवीमुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि गंभीर डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत किडनीला नुकसान होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन होते. रुग्णांना यामुळे कमी रक्तदाबाचा त्रास देखील होऊ शकतो आणि स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

पालिका शाळांचा दर्जा सुधारा
विभागांमधील शिक्षणाचा आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी एक प्राथमिक अहवाल तयार करण्यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये पटसंख्या, शाळेच्या इमारतींची सद्यःस्थितीची पाहणी, शाळा अद्ययावत करण्यासाठी उपाययोजना राबविणे यांचा समावेश असावा. या अहवालाच्या पूर्ततेसाठी ठाणे तसेच आसपासच्या उत्तम दर्जाच्या शाळा चालविणाऱ्या संचालकांचा तसेच शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करावी. त्याद्वारे महापालिकेच्या शाळांची स्थिती कशी बदलता येईल याबाबत अहवाल तयार करण्यात यावा इत्यादी सूचना करण्यात आल्या.

आपला दवाखाना
आरोग्य हित पाहता स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ठिकठिकाणी आपला दवाखाना सुरू करावा. मोकळा भूखंड असल्यास कंटेनरच्या माध्यमातून आपला दवाखाना सुरू करण्यात येईल अशा सूचनाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT