मुंबईः गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. तीन दिवस पावसानं मुंबईसह उपनगरांना अक्षरशः झोडपून काढलं. बुधवारी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा फटका कोविड केअर सेंटरलाही बसला आहे. पावसामुळे सेंटरमध्ये पाणी गळती आणि पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. दहिसरच्या जंबो कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी रात्री जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सेंटरच्या शेडचा काही भाग कोसळला.
दहिसरमधील कोविड केअर सेंटरच्या प्रवेशद्वारा पर्यंत खूप पाणी साचलं. या केंद्रात अतिदक्षता विभागात 30 आणि सामान्य वॉर्डात 50 रुग्ण आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बांधलेल्या या सुविधेचे काम जुलैपासून सुरु झाले. पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, लाकूड आणि प्लास्टिकचा वापर करुन या सेंटरची शेडची रचना तयार केली गेली आहे. त्यामुळे ही शेड सोसाट्याचा वारा सहन करु शकत नाही. बुधवारी रात्रीपर्यंत, प्लास्टिकच्या शेडचा एक भाग कोसळला आणि केंद्राच्या कंपाऊंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.
आम्ही MMRCला सेंटरची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. जर व्यवस्थापन करणे अवघड झाल्यास आम्ही रुग्णांना दुसर्या केंद्रात हलवू, असं आर-उत्तर प्रभागातील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या.
इतर रुग्णालयांमधल्या कर्मचार्यांना कामावर येणंच कठिण झाले आणि दरम्यान अन्य कर्मचाऱ्यांना दोन्ही शिफ्टमध्ये काम करावं लागलं. दहिसर कोविड केंद्राचा एक भाग प्लास्टिक, ताडपत्री आणि लाकडापासून बनलेला आहे. एमएमआरसीचे प्रवक्ते म्हणाले, जिथे रुग्ण दाखल आहेत अतिवृष्टीमुळे दहिसर कोविड केअर सेंटरच्या जर्मन हॅन्गर शेडचे कोणतेही नुकसान झाले नाही. दरम्यान डॉक्टरांच्या खोलीतील काही भाग खराब झाल्यामुळे त्याची दुरुस्ती केली जात आहे.
बीकेसी सेंटर पाणी साचलं नसलं तरी कर्मचाऱ्यांची कमतरता नक्कीच जाणवली.
रुग्णालयानं जवळचं असलेल्या ललित आणि सोफिटेल हॉटेल्समध्ये कर्मचार्यांची राहण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे नर्स आणि डॉक्टर त्यांच्या वेळेत कामावर पोहोचू शकले. गुरुवारी ४३ वॉर्ड बॉयपैकी केवळ पाचच वॉर्ड बॉय कामावर हजर होते.
महालक्ष्मी कोविड सेंटरमध्येही काही प्रमाणात गळती झाली होती. दरम्यान कोविड रूग्णांना अद्याप प्रवेश देण्यात येण्याची सुविधा सुरू झालेली नाही.
मुसळधार पावसाचा फटका रुग्णवाहिकेच्या सेवेलाही बसला. अॅम्ब्युलन्स अॅग्रीगेटर ‘Dial 4242’ ला बुधवारी १७७ कॉल आले, जे जुलैपासूनचे सर्वात जास्तीत जास्त कॉल होते. त्यापैकी 25 रुग्णवाहिका पुरवठादारांनी पावसामुळे रुग्णांना घेऊन जाण्यास नकार दिला.
Mumbai heavy rain lashed Covid care centres leakages waterlogging
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.