मुंबई - मुंबईला आज जोरदार पावसाने मुंबईला झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली. अंधेरी, सबवेत दोन ते तीन फूट पाणी तुंबल्याने सबवे बंद करण्यात आला.
अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक मंदावल्याने ट्रॅफिक झाले. तर कुर्ला येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक कोलमडली. तर मध्य रेल्वे वाहतूकही अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत मुसळधार कोसळला. दोन ते अडीत तास संततधार बरसल्याने अंधेरी सबवे, जूहू गल्ली रोड, असल्फा मेट्रो स्टेशन, घाटकोपर, साकीनाका, जोगेश्वरी, मरोळ, मरीन ड्राईव्ह, विक्रोळी, अंधेरी चकाला, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर शेल कॉलनी, विद्याविहार, वांद्रे, परळ, दादर आदी सखल भागात पाणी साचले.
अंधेरी सबवेत दोन ते तीन फूट पाणी साचल्याने सबवे बंद ठेवण्यात आला होता. सायन गांधी मार्केट येथेही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक वळवण्यात आली. रस्ते वाहतुकीला फटका बसल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीत प्रवाशांना अडकून पडले. त्यामुळे कार्यालयात पोहचायला विलंब झाला.
दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने महापालिकेने पाणी साचणा-या ११० ठिकाणी .यंत्रणा सज्ज ठेवली होती. पाणी साचणा-या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आला. हार्बर मार्गावरील कुर्ला ते वडाळा येथील वाहतूक ठप्प झाली. त्याचा फटका प्रवाशांना बसला. सहाय्यक आयुक्तांना त्यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी करण्याचा सुचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
समुद्र किनारी मज्जाव
दुपारी अडीच वाजता समुद्राला ४.२१ मीटर उंचीची होती, त्यामुळे उधाण आले होते. याचवेळी पाऊस असल्याने येथे सुरक्षा तैनात करण्यात आली होती. समुद्र किनारी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला. मात्र तरीही गार वा-यासह पडणारा पाऊस, समुद्रात उसळणा-या लाटा याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर, पर्यटकांनी समुद्र, बीच, चौपाट्या परिसरात गर्दी केली होती. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती.
......
पावसाची नोंद -
शहर - ७३.६२ मिमी
पूर्व उपनगर - ८८.३० मिमी
पश्चिम उपनगर - ६३.२९ मिमी
........
येथे पाणी साचले -
अंधेरी सबवे, जूहू गल्ली रोड, असल्फा मेट्रो स्टेशन, घाटकोपर, साकीनाका, जोगेश्वरी, मरोळ, विक्रोळी, अंधेरी चकाला, सायन -गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर शेल कॉलनी, विद्याविहार, वांद्रे, परळ, दादर टीटी, आरे कॉलनी आदी सखल भागात पाणी साचले.
........
आयुक्तांनी केली पाहणी
मुंबईत जोरदार पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी अंधेरी सबवे, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, दादर, हिंदमाता येथे भेट देऊन पाहणी केली. हा सखल भाग असल्याने येथे उपाययोजनांबाबत आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
.......
या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद -
माटुंगा - १०४ मिमी
कुलाबा - ९८ मिमी
सी विभाग - ९२ मिमी
ग्रान्टरोड ८६ मिमी
पालिका मुख्यालय - ८५ मिमी
घाटकोपर - १३० मिमी
कुर्ला - ११६ मिमी
गोवंडी, चेंबूर - १०१ मिमी
.......
१४ ठिकाणी झाडे पडली
शहर ३, पूर्व उपनगर ६ व पश्चिम उपनगर येथे ५ अशी १४ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. तर चार ठिकाणी घरे व घरांच्या भिंती कोसळल्याची घटना घडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.