Mumbai Heavy Rain  sakal
मुंबई

Mumbai Heavy Rain : पावसाने थांबवली मुंबईची लाईफ लाईन, प्रवाशांचा रेल्वेरुळांवरुन धोकादायक प्रवास

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local Latest Update: मुंबई सह ठाण्यात रविवारी मध्यरात्रीपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे सखलभागात पाणी शिरलं असून याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला स्थानकात तर रेल्वेच्या रुळांवरच पाणी शिरल्यामुळे रुळ पाण्याखाली गेले आहेत. पर्याय लोकल धावण्यास विलंब होत आहे.

दादर, माटुंगा, भांडुप, अंधेरी, कुर्ला परिसरात रेल्वे ट्रॅक वर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाले आहे. ठाण्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन्स ठप्प झाले आहेत. पर्यायी नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करण्यात येत आहे. तर प्रवाशांनी संयम बाळगावा असं आवाहन यावेळी रेल्वेने केलं आहे. रेल्वे रुळांवरुन लोक चालत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

रात्रभर बरसलेल्या पावसामुळे कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी भरलं आहे. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुर्ला स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल थांबल्या आहेत. कित्येक तासापासून या गाड्या थांबल्या आहेत. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत असून नागरिक रेल्वे गाडीतून खाली उतरत ट्रॅकवरून चालत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

मात्र ट्राय वरून चालणे हे खूप आव्हानात्मक असतं. गेल्या वर्षी ट्राय वरून चालण्यावेळी एक दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये आईच्या हातातून बाळ निसटून नाल्यात पडलो होतो. यामुळे नागरिकांनी असा प्रवास करणे अतिशय जोखमीचा आहे. ट्रॅक वरून चालत कोणीही प्रवास करू नये असे आवाहन केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT