Nawab Malik  sakal media
मुंबई

'त्या' दाव्यावर खुलासा करण्याचे मुंबई हायकोर्टाचे मंत्री मलिक यांना निर्देश

सुनिता महामुनकर

मुंबई : मानहानीकारक फलकबाजी केल्याच्या आरोपात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Mumbai district central cooperative bank) दाखल केलेल्या दाव्यावर खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज महाविकास आघाडीमधील (mva government) मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांना दिले.

मलिक यांच्याविरोधात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा बँकेने दाखल केला आहे. बँकेसंबधित वादग्रस्त मजकूर असलेली होर्डिंग्ज मलिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी झळकवली, यामुळे बैकेच्या व्यवहाराबाबत साशंकता आणि गैरसमज निर्माण झाले, असा आरोप दाव्यात केला आहे. चालू वर्षी जुलै मध्ये ही होर्डिंग्ज लावली होती. बँकेत भ्रष्टाचार झाला आहे आणि तेथील ठेवी सुरक्षित नाही, असे यामध्ये भासविण्यात आले असा युक्तिवाद वकील अखिलेश चौबे यांनी बैकेच्या वतीने केला.

मलिक यांनी या आरोपांचे खंडन केले आणि दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे बँकेने दावा दाखल केला आहे, आणि मलिक यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. न्या रियाज छागला यांच्या पुढे आज यावर सुनावणी झाली. न्यायालयाने मलिक आणि अन्य कार्यकर्त्यांना सहा आठवड्यात लेखी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होताच हर्षित राणाने दाखवली ताकद! ५ विकेट्स तर घेतल्या, पण फिफ्टीही ठोकली

Salman Vs Bishnoi: सलमानसाठी 'या' राजकीय नेत्यानं म्हटलं 'मै हूँ ना! बिश्नोईच्या गँगकडून आला फोन, दिली धमकी

Jobs In Germany : जर्मनीत जॉबची संधी! प्रत्येक वर्षी ९० हजार भारतीयांना व्हिसा देण्याचा सरकारचा निर्णय

Jayant Patil: उद्धव ठाकरे व आम्ही बसून येत्या चार तारखेपर्यंत 'परंडा' विधानसभेचा उमेदवारीचा तिडा सोडवणार

Rohit Sharma बेस्ट ओपनर! ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून वाहवाह; स्मिथ-हेझलवूडसह अनेकांच्या World XI मध्ये स्थान

SCROLL FOR NEXT