मुंबई

कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारी मदतनिधीवर पहिल्या पत्नीचा अधिकार

सुमित बागुल

मुंबई : कोरोनाच्या महाभयंकर काळात आपल्या रक्षणासाठी आपले डॉक्टर्स आणि आपले पोलिस आपल्यामागे  भक्कमपणे उभे आहेत. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून कोरोनाच्या संवेदनशील काळात या योद्धयांकडून आपलं रक्षण केलं जातंय. अशात कर्तव्यावर असताना कुणाही डॉक्टर किंवा पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवारास सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

या मदतीवरूनच मुंबई उच्च न्यायालयात एक वेगळी केस आली होती. महाराष्ट्र रेल्वे पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश हातणकर यांचं ३० मे रोजी करोनामुळे निधन झाले. राज्य सरकारच्या जीआरप्रमाणे करोना विरुद्धच्या लढ्यात शहीद झाल्याने सुरेश हातणकर यांच्या कुटुंबाला ६५ लाख रुपयांची भरपाई मिळणार होती. आता सरकारकडून मिळणार असलेल्या आर्थिक नुकसान भरपाईवर त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून असलेल्या मुलीने दावा केला आहे 

यावर मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक निरीक्षण नोंदवलं आहे. एखाद्याच्या ‘दोन पत्नी असल्यास अशा केसमध्ये पतीच्या निधनानंतर नुकसान भरपाईच्या पैशांवर केवळ पहिल्या पत्नीचा आणि पतीच्या दोन्ही पत्नींच्या मुलामुलींचा हक्क राहू शकतो’ असं प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय. 

काय आहे प्रकरण : 

३० मे रोजी करोनामुळे महाराष्ट्र रेल्वे पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश हातणकर यांचं निधन झालं. यानंतर राज्य सरकारच्या जीआरप्रमाणे करोना विरुद्धच्या लढ्यात शहीद झाल्याने सुरेश हातणकर यांच्या कुटुंबाला ६५ लाख रुपयांची भरपाई मिळणार होती. या भरपाईमध्ये वाटा मागण्यासाठी सुरेश हातणकर यांना दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या मुलीने, श्रद्धाने दावा केला होता. यावर न्या. शाहरुख काथावाला यांच्या नेतृत्वात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे प्राथमिक सुनावणी झाली. 

या सर्व प्रकरणात सुरेश यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलींने सुरेश हातणकर यांनी दुसरं लग्न केलं नसल्याचं सुनावणीदरम्यान नमूद केलं. तर पहिल्या पत्नीला आणि त्यांच्या मुलीला याबाबत माहिती होती आणि दोन्ही विवाह नोंदणीकृत असल्याचं श्रद्धाचे वकील प्रेरक शर्मा यांनी म्हटलंय. या बाबत आता कोर्टाने पहिल्या पत्नी आणि मुलीचं ऍफिडेव्हिट मागवलं आहे. या प्रकरणात अंतिम सुनावणी बाकी आहे. 

mumbai high court only first wife and kids from both the wifes are entitled to get benifits in case of death

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT