"Mumbai High Court building with a focus on the administration's negligence in crimes against women."  esakal
मुंबई

Mumbai High Court: महिला अत्याचारांवर पोलिसांची कारवाई अन् प्रशासनाच्या दाव्यांमध्ये तफावत; मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

Court Directs Home Secretary to Address Lapses in Police Investigations: मुंबईतील महिलांच्या विनयभंगाच्या प्रकरणात आणि पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या गंभीर प्रकरणात न्या. अजय गडकरी व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले

Sandip Kapde

Court Directs Home Secretary to Address Lapses in Police Investigations

मुंबई उच्च न्यायालयाने महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाची गंभीरता नसल्याचे निरीक्षण नोंदवत, राज्याच्या गृह सचिवांना तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने प्रशासनाच्या "महिलांवरील अत्याचार व गुन्हे अत्यंत गांभीर्याने तपासले जातात" या दाव्याचा फोलपणा उघड केला आहे.

मुंबईतील महिलांच्या विनयभंगाच्या प्रकरणात आणि पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या गंभीर प्रकरणात न्या. अजय गडकरी व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. न्यायालयाने पोलिसांची कारवाई आणि प्रशासनाच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचे स्पष्ट केले आहे.

बेलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरण-

बेलापूर येथील दोन ४ वर्षांच्या चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. १२ आणि १३ तारखेला घडलेल्या या घटनांमुळे मोठा आक्रोश उठला. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पीडित मुलींच्या पालकांना तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल ११ ते १२ तास लागले, ज्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एका दुसऱ्या प्रकरणात केलेले विधान महत्त्वाच आहे.

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह-

न्यायालयाने अशा अनेक घटनांमध्ये पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महिलांवरील अत्याचारांच्या तपासात पोलिसांची उदासीनता आणि दिरंगाई हे गंभीर समस्येचे निदर्शक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने गृह सचिवांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाचे आदेश-

न्यायालयाच्या या निर्णायक विधानामुळे राज्यातील महिला सुरक्षा आणि न्यायप्राप्तीसाठी पोलीस प्रशासनावर कडक नजर ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला आणि पोलीस प्रशासनाला महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक तत्पर आणि संवेदनशील होण्याचे निर्देश दिले आहेत.

महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी आपल्या जबाबदारीचे गांभीर्य ओळखून काम करणे अत्यावश्यक आहे, असे न्यायालयाने सांगितले. न्यायप्रणाली आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी ही एक महत्त्वाची पावले ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

SCROLL FOR NEXT