Mumbai sakal
मुंबई

Mumbai: विद्याभवनचे शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले 91 विद्यार्थी

Ghatkopar : गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचे पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-2024 रोजी घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( इ.8 वी ) परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या विद्याभवन शालेय संकुल, घाटकोपर मधील इयत्ता 5 वी चे 45 तर इयत्ता 8 वी चे 46 असे एकूण 91 विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

यात इंग्रजी माध्यम पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता5 वी ) - 29 , पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) - 40, मराठी माध्यम ( सेमी इंग्रजी ) पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता5 वी) - 16 , पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) - 6 , मराठी माध्यमाचा इयत्ता 8 वी चा विद्यार्थी तन्मय अमित पळसकर याने 220 गुण मिळवून मुंबईत 7 वा तर ईश्वरी श्रीधर एरंडे हिने 218 गुण मिळवून मुंबईत 57 वी येण्याचा मान पटकावला आहे.

तसेच इंग्रजी माध्यमाचा इयत्ता आठवीतील शुभम विजय शिंदे याने 196 गुण मिळवून मुंबईत 45 वा तर इयत्ता पाचवीतील लक्ष रमेश पाशकांती आणि कौस्तुभ संतोष नलावडे या दोघांनीही 214 गुण मिळवून मुंबईत 71वा येण्याचा मान पटकावला आहे.

शाळेची गुणवत्ता व दर्जा कायम ठेवून संपूर्ण घाटकोपर विभागातून मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी विद्याभवन शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचे पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT