Mumbai  
मुंबई

Mumbai : अवघ्या 4 महिन्यातच, 645 कोटी खर्चून बांधलेल्या पुलाची दुरावस्था; पहिल्याच पावसात खड्डेच-खड्डे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्ताराचा पहिल्या टप्प्यातील ६४५ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या रस्ता पहिल्याच पावसात खड्डेमय झाल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते.

केवळ चारच महिन्यात रस्ता खड्डेमय झाल्यामुळे अभियंते आणि कंत्राटदारांनी केलेल्या निकृष्ट कामाचा या खड्ड्यांमुळे पर्दाफाश झाला आहे. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) हा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एक उन्नत मार्ग आहे.

बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्या द्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमीचा उन्नत मार्ग असणार आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या भागतील १.८ कि.मी. लांबीचा महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग (अप रॅम्प) आणि महानगर टेलिकॉम निगम लि. (बीकेसी) ते लालबहादुर शास्त्री पुलाला (कुर्ला) जोडणारा १.२६ किमीची उन्नत मार्ग (अप रॅम्प) बांधण्यात आले आहेत. हे दोन्ही उन्नत मार्ग ज्यांची रुंदी ८.५ मी. इतकी असून ही २ लेनची मार्गिका १० फेब्रुवारी २०२३ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करत वाहतुकीस खुली करण्यात आली.

यापैकी कपाडिया नगर येथील कुर्ला वरून सांताक्रूझच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे पडले आहे. पावसामुळे पाणी साचून आता या खड्ड्यामुळे नागरिकांना या पुलावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. या मार्गाने दररोज वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी एमएमआरडीएच्या निकृष्ट दर्जाच्या तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

यांनतर एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी तात्काळ कामाचा अहवाल मागविला असून हे खड्डे लवकरात लवकर भरण्याचे आदेश दिल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. त्यानुसार प्रकल्पस्थानावर भेट दिली असता कर्मचारी काम सुरु करणार असल्याचे सांगत होते मात्र तोपर्यंत कामाला सुरुवात झालेली नव्हती.

प्रकल्पाविषयी

-टप्पा १ प्रकल्पाची लांबी एकूण ५.९० किमी

-प्रकल्पाचा एकूण खर्च ६४५ कोटी

- ग्रँड हयात हॉटेल ते रझाक जंक्शन (१.८ किमी)

-बीकेसी ते कुर्ला (१.२६ किमी)

-पूर्व द्रुतगती व पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडणारा उन्नत मार्ग

ट्विटर प्रतिक्रिया

- खड्डेमय पुलाचा व्हिडीओ शेअर करत एक मुंबईकर लिहितात,"मुंबई विद्यापीठाजवळून जाणाऱ्या कुर्ला ते सांताक्रूझपर्यंत नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची अवस्था बिकट आहे."

- हा उड्डाणपूल माझ्या घराजवळ आहे आणि २ वर्षांहून अधिक काळ बांधकाम सुरू असताना नुकताच जी२० बैठकीच्या आधी हा पूल सुरू झाला. काही महिन्यांत ही स्थिती असेल, तर महामार्ग बांधणीच्या गतीचा अभिमान बाळगू नये.

-सर्वसामान्यांची आणि त्यांनी भरलेल्या करांची ही काय थट्टा आहे. ही एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे मात्र या सगळ्याची कोणीच जबाबदारी घेणार नाही. मुंबईतील प्रत्येक रस्त्याच्या बाबतीत हेच घडते.

- हे अलीकडच्या काळातील सर्वात निकृष्ट बांधकामांपैकी एक असावे. यांना केवळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची घाई आहे, परंतु करदात्याच्या पैशावर "गुणवत्तेपेक्षा जास्त" तडजोड केल्याबाबदल अभिनंदन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT