Dr. babasaheb Ambedkar Statue sakal
मुंबई

Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीला लागणार अडीच वर्षे

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे.

मुंबई - दादरच्या इंदू मिलमधे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर हा पुतळा उभारण्यासाठी साधारण अडीच वर्षाचा कालावधी लागेल, अशी माहिती उपसमितीतील सदस्यांनी दिली.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे. दरम्यान, पुतळ्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्या विशेष उपसमितीने गाझियाबाद येथील कार्यशाळेला भेट दिली.

राज्य सरकारच्या सुचनेनुसार गुरुवारी (ता.६) रोजी समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटूंबातील सदस्य, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचा गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.

यावेळी या सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले, तसेच, काही किरकोळ बदल सुचविले. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येईल. यावेळी सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळयाबद्दलचे सादरीकरण केले. पुतळ्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच पुतळ्याचे काम सुरु करण्यात येईल. पुतळा उभारण्यासाठी साधारण अडीच वर्षाचा कालावधी लागेल, अशी माहिती समितीतील सदस्यांनी माध्यमांना दिली.

या दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, आमदार बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदिप कवाडे, भदंत राहूल बोधी यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, आदि उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रचना

- चबुतऱ्यासह ४५० फुट उंची

- पुतळ्याची उंची ३५० फुट

- पुतळ्याचा पाया १०० फुट

- पादपीठामध्ये बौध्द वास्तुरचना शैलीतील घुमट

- पुतळयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार मार्गिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT