Airplane Caught Fire: विमानतळावर आपली संकट प्रतिसाद क्षमता मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने बुधवारी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी नियोजित पूर्ण स्केल एअरक्राफ्ट आपत्कालीन सरावाचे (एफसीएईई) आयोजन केले होते. दोन तासांची ही मॉकड्रिल दुपारी १२ वाजता सुरू झाली आणि अंदाजे २ वाजून ५ मिनिटांनी संपले आहे.
धावपट्टी ओव्हरशूट करणारे विमान आणि त्याच्या अंडर कॅरेजला आग लागल्याचे अनुकरण करून ही यशस्वी मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती. मुंबई विमानतळामधील सामान्य ऑपरेशन्समध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करून रिअल-टाइममध्येही यशस्वी मॉकड्रिल पार पडली आहे.
या मॉकड्रिलमध्ये मध्यम आकाराच्या विमानाचे मॉडेल मॉक-अप विमान म्हणून वापरले गेले. जे धावपट्टी ओव्हरशॉट करते. आग पकडणाऱ्या विमानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी मॉक-अप विमानाच्या अंडर कॅरेजला आग लावण्यात आली. मॉक-अप विमानाला आग लागल्याची सूचना एटीसीने विमानतळ प्रशासनाला देऊन कवायतीला सुरुवात केली.
या सरावात एमआयएएल, एअरलाइन्स, एअर ट्रॅफिक कंट्रोल, सीआयएसएफ, एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन, कस्टम्स, इमिग्रेशन, ग्राउंड हँडलिंग एजन्सी, मुंबई पोलिस, मुंबई फायर ब्रिगेड, नागरी संरक्षण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एमसीजीएम आपत्ती यासह अनेकांचा सहभाग होता. डीजीसीएस नियमांनुसार विमानतळांना दर दोन वर्षांनी एकदा पूर्ण-प्रमाणात विमान आपत्कालीन सराव करणे बंधनकारक असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.