मुंबई

जेजे रुग्णालय परिसरात RMC प्लांट; रुग्णांच्या आरोग्यास धोका

कारवाईची रहिवाशांची मागणी

मिलिंद तांबे

मुंबई : भायखळ्यातील जेजे रुग्णालय (JJ hospital) परिसरात आरएमसी प्रकल्प (RMC Plant project) उभारण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील क्षेत्रालगत (Sensitive area) आशा प्रकारचे प्लांट उभारण्यावर (plant project even after banning) बंदी असून देखील हा प्रकल्प उभा राहिला आहे. यामुळे रुग्ण, नातेवाईक व आसपास राहणाऱ्या राहिवाशांच्या जीवाला धोका (People life in danger) निर्माण झाला आहे.

भायखळा येथील इब्राहिम रहमतुल्ला रोडवर जेजे रुग्णालयाजवळ आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथील राहिवाश्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने जे.जे. रूग्णालयाच्या परिसरात बेकायदेशीर प्रकल्प उभारला असल्याचे रहिवाशी दानिश शेख म्हणाले. या प्रकल्पामुळे या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.प्रकल्पाच्या आसपास रुग्णालयातील हजारो रुग्ण त्यांचे नातेवाईक व आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांच्या आरोग्यास या प्रकल्पाचा धोका आहे असे दानिश शेख यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकाशित केलेल्या बैठकीच्या निकषांनुसार व्यावसायिक प्रकल्पासाठी 100 मीटरचा बफर झोन असणे आवश्यक आहे असे वॉच डॉग फाउंडेशनचे प्रमुख ऍडव्हीकेट गॉडफ्राय पिमेंटा यांनी सांगितले.या अधिसूचनेमध्ये असेही नमूद केले आहे की संवेदनशील क्षेत्राच्या बाबतीत उक्त बफर झोन किमान 200 मीटरचा असावा. भायखळ्यातील 44 एकर मध्ये पसरलेले जे.जे. रुग्णालय हे दक्षिण मुंबईतील प्रमुख आणि सर्वात मोठे रुग्णालय संकुल आहे, ज्यात हजारो रुग्ण उपचार घेत आहेत.

आरएमसी प्रकल्पाच्या कामामुळे दाट लोकवस्तीच्या परिसरात मोठं रुग्णालय व निवासी संकुलातील डॉक्टर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांना त्रास होणार आहे. प्रकल्पामुळे निर्माण होणारी प्रदूषित हवा तसेच रुग्णालय परिसरामध्ये साचणारी धूळ यामुळे रूग्णांचा जीव धोक्यात येईल. त्यामुळे प्रदूषण मंडळ तसेच मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाला दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी अशी मागणी ही पिमेंटा यांनी केली आहे. वॉचडॉग फाउंडेशनने या विरोधात आवडी उचलला आहे. आरएमसी चा हा प्रकल्प बेकायदेशीर असल्याची तक्रार मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री,महाराष्ट प्रदूषण नियंत्रित मंडळ तसेच महानगरपालिकेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT