Raju Patil  esakal
मुंबई

Mumbai : केडीएमसी फेल, 27 गावे बाहेर काढा; आमदार राजू पाटील यांची मागणी

रस्त्यांचे काम नाहीच पण नाले सफाई देखील झाली नसल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून आडीवली ढोकळी येथील रस्ताच बंद झाला.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली सोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्डयांनी दुरावस्था झाली आहे. रस्त्यांचे काम नाहीच पण नाले सफाई देखील झाली नसल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून आडीवली

ढोकळी येथील रस्ताच बंद झाला आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरत आहे. या रस्त्याची परिस्थिती आणि त्रस्त नागरिक पाहून आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी मधून 27 गावे वगळण्याची मागणी केली आहे.

या गावात पालिकेने 1रुपयांचे काम केलेले नाही. त्याच्याकडून काही होणार नाही व आता अपेक्षा देखील नाही असे म्हणत आमदार पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या 27 गावांपैकी 18 गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. उर्वरित 9 गावांचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असल्याने ही गावे महापालिकेतच ठेवण्यात आली.

या निर्णयास 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने विरोध केला. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने 18 गावातील विकास कामाकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. सध्याच्या स्थितीत या गावांमध्ये कचरा, खराब रस्ते, अस्वच्छ गटारे, अनधिकृत बांधकामे आदी गोष्टींमुळे बकाल अवस्था आली आहे.

कल्याण ग्रामीण मधील आडीवली ढोकळी गावाचा विचार केला तर गावात रस्ते आहेत का हा प्रश्न पडावा. गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले.

पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे नाहीत तसेच नैसर्गिक नाले ही कचरा तुंबळ्याने बंद होऊन पाणी साचून राहिले आहे. पाऊस उघडला तरी देखील या पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घाण पाण्यातून नागरिकांना ये जा करावी लागत असून दुर्गंधी सोबतच रोगराई देखील गावात पसरली आहे.

मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी या परिसराची पाहणी केली असता. नागरिकांनी त्यांना घेराव घालत समस्या सोडवणार कधी अशी विचारणा केली. यावेळी आमदार पाटील यांनी लवकरच नागरिकांची या बिकट परिस्थितीतून सुटका होईल असा विश्वास दिला.

गावांतील रस्ते कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे. मात्र पाऊस झाल्याने कामास सुरवात झाली नाही. पुढील आठवड्यात या कामास सुरवात करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, केडीएमसीने या भागात एक रुपयांचे देखील काम केलेली नाही. कोविडच्या काळात कोणत्याही सुविधा दिल्या नसून आता टॅक्ससाठी मात्र सक्ती करत आहेत. केडीएमसी कडून येथे काही होणार नाही. आता आम्हाला अपेक्षा देखील नाहीत. 27 गावे पालिकेतून वगळा तरच त्यांचा विकास होईल.

केडीएमसी मधील रस्त्यांची अवस्था आपण पहिली आहे. एकाचा जीव गेला तरी अधिकारी जागे होत नाहीत. अधिकारी कंट्रोल रूम मध्ये बसून केवळ पाहणी करत आहेत. खड्यांसाठी टोल फ्री नं काढला आहे,आतापर्यन्त किती खड्डे भरले असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

यानिमित्ताने 27 गावांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 27 गावांमध्ये मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे, ग्रोथ सेंटर रद्द करणे, भाल, भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे.

आरोग्य व शिक्षण व्यवस्था सदृढ करणे, अशा काही मागण्या संघर्ष समितीकडून केल्या जात आहेत. याबाबत प्रशासना सोबत बैठकी सुद्धा पार पडल्या, मात्र प्रशासन गंभीर्याने लक्ष देत नाही.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 27 गावात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि भाजप या चारही पक्षांची चांगली ताकत आहे. मात्र शिवसेनेत दोन गट झाले आहेत, अजित पवार गट युती मध्ये आला आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

तर भाजपच्या काही माजी नगरसेवकांचा ही गावे काढण्यासाठी विरोध आहे, तर 27 गावातील सर्वपक्षीय समितीचा ही गावे काढा अशी मागणी आहे. यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी मधून ही गावे वगळा अशी मागणी करत या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT