Mumbai sakal
मुंबई

Mumbai : न केलेल्या कामाचे श्रेय घेते केडीएमसी ! प्रशासनावर उपरोधिक टिका

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण येथील नेतीवली टेकडीवरील झोपडपट्टीतील घरांना आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून आकर्षक अशी रंगरंगोटी करत देखणे रूप देऊ केले आहे. केडीएमसी प्रशासनाने आपल्या अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेवर नेतीवली टेकडीवरील रंगविलेल्या घराचे छायाचित्र छापले आहे.

केडीएमसीने न केलेल्या कामाचे श्रेय घेतले आहे. त्यासाठी आयुक्तांचे मानावे तेवढे आभार कमी आहे अशी उपरोधिक टिका मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी केडीएमसी प्रशासनावर केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत नेतीवली टेकडी येथील झोपडीधारकांना केडीएमसीकडून सोयी सुविधा पुरविल्या जात नाही.

गेली अनेक वर्षे येथील नागरिक अपुऱ्या सोयीसुविधासह बकाल अवस्थेत रहात होते. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून 20 लाख निधी खर्च करत टेकडीवरील घरे रंगविण्यात पुढाकार घेतला.

आकर्षक विविध संदेश देणारी चित्र या झोपडींच्या भिंतीवर रेखाटण्यात आल्यानंतर ही टेकडी कधी नव्हे तेवढी देखणी दिसू लागली आहे.

केडीएमसीने आमदार पाटील यांच्या कामाची दखल घेत, या टेकडीचे छायाचित्र केडीएमसीच्या अंदाज पत्रक पुस्तिकेवर छापले आहे. काम आमदारांनी केले श्रेय मात्र पालिका प्रशासन घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावर मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी पालिकेचे कौतुक करत उपरोधिक टिका केली आहे.

हर्षद पाटील म्हणाले, नेतेवली टेकडीवर पालिका प्रशासनाने आतापर्यंत काहीही सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. सोयीसुविधा नाही परंतु त्यांना एक समाधान मिळावे म्हणून आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या घरांना रंगरंगोटी करून दिली आहे.

मी आयुक्त साहेबांचे आभार मानेल, की त्यांनी आमदारांच्या कामाची दखल घेऊन महानगरपालिकेच्या बजेट पुस्तिकेवर ती छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यापुढे देखील अशीच आमदारांच्या कामाची दखल आपण घ्यावी असा टोला पाटील यांनी मारला आहे.

त्याबरोबरच केडीएमसीला शहर सौंदर्यीकरणाचा नुकताच पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार 10 कोटी रुपये रक्कमेचा आहे. हा पुरस्कार केडीएमसीने स्विकारला. मात्र स्वखर्चातून मनसे आामदारांनी केलेल्या रंगरंगोटीचे महापालिकेने श्रेय घेणे कितपत योग्य आहे. दुसऱ्याचे श्रेय लाटणाऱ्या केडीएमसीचे जिल्हा संघटक पाटील यांनी आभार मानत अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT