Mumbai news esakal
मुंबई

Mumbai : कार्यालयात वेळेत उपस्थित का राहिला नाहीत? 48 तासात करा खुलासा

केडीएमसीत अतिरिक्त आयुक्तांनी घेतली उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी वेळेत येणे अपेक्षित असताना तासभर कर्मचारी उशिरा कार्यालयात येत आहेत. याविषयी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर सोमवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सकाळी मुख्यालयाच्या गेटवर उभे रहात कर्मचारी वर्गाची उशिरा आल्या बाबद्दल चांगलीच हजेरी घेतली. उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंत्यासह, मुख्य लेखा अधिकारी देखील असल्याने वेळेचे भान कोणालाच नसल्याचे यावरून स्पष्ट होते. उशिरा येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना 48 तासाचा अवधी देत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईत सातत्य राहणार का, की उद्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच होणार हे पहावे लागेल.

केडीएमसी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणे 10 वाजता हजेरी लावणे अपेक्षित आहे. मात्र कोरोना काळापासून बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने वेळेचे भान कोणालाच राहिले नव्हते. अर्धा एक तास उशिराने अधिकारी, कर्मचारी कार्यालयात येत आहेत. अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने तासनतास नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत असे. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी पालिकेकडे केल्या आहेत. मध्यंतरी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी नागरिकांच्या कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्तभंग कारवाईचा इशारा दिला होता. जिथे अधिकारीच वेळेत कार्यालयात येत नाही तिथे लोकांची कामे वेळेत कशी पूर्ण होणार ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अधिकारी, कर्मचारी यांना वेळेत कामावर येण्याची शिस्त लागावी म्हणून त्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जात होती. कोरोना काळात बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध उठले तरी, बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आलेली नाही. याचाच फायदा अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. सकाळी लेट कामावर येन, मध्येच निघून जाणे, एक दिवस येऊन पूर्ण आठवड्याची हजेरी लावणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

सोमवारी सकाळी आज सकाळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिका मुख्यालय गाठलं. पालिकेचे प्रवेशद्वारावर उभे राहून उशिराने येणाऱ्या कर्मचारी,अधिकाऱ्यांची त्यांनी हजेरी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंत्यासह, मुख्य लेखा अधिकारी देखील सहभागी असल्याचे दिसून आले. अतिरिक्त आयुक्त स्वतः मुख्यालयाच्या गेटवर उभे असल्याने अधिकारी, कर्मचारी यांनी प्रथम हजेरी लावण्यास प्राधान्य दिले. आपला वेळ आणखी उशिरा लागू नये म्हणून त्यांची एकच धांदल उडाली. अखेर सर्वांना एका रांगेत उभे करत हजेरी लावण्याचा सूचना करण्यात आल्या.

शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयाची वेळ सकाळी पावणेदहा ते पावणे सहा असताना कर्मचारी वेळेत येत नसल्याचे दिसून आले. यामुळे अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी या अधिकाऱ्यांना समजावत कारणे दाखवा नोटीस बजावली आली आहे. 48 तासात उशिरा येण्याचे कारण दाखवा अशा सूचना करण्यात आली असून कारण न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

ही कारवाई केवळ नोटीस पुरती सीमित राहू नये, तर यामध्ये सातत्य असावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेले कित्येक महिने उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचा फटका नागरिकांना बसत आहे. एक दिवस अतिरिक्त आयुक्त यांनी पहाणी केली, परंतु ही पहाणी सातत्याने केली तर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये वचक निर्माण होईल. अन्यथा मागचे दिवस पुन्हा अशीच परिस्थिती पालिका मुख्यालयात राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT